shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संघर्षातून शिखरावर! कोल्हापूरचे नवे आयुक्त राजेंद्र भारूड यांची प्रेरणादायी कहाणी 🔥


कोल्हापूर : “जन्म कुठे घ्यायचा हे आपल्या हातात नसतं, पण आयुष्य कुठपर्यंत नेायचं हे मात्र आपल्या जिद्दीवर ठरतं!” — ही ओळ अक्षरशः जगून दाखवणारे नाव म्हणजे कोल्हापूर शहराचे नूतन आयुक्त राजेंद्र भारूड.
साक्री तालुक्यातील सामोडे या छोट्याशा गावात भिल्ल जमातीत जन्मलेले भारूड यांचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. जन्माआधीच वडिलांचे छत्र हरपले, तर आई मोहाची दारू विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. एवढ्या बिकट परिस्थितीतही आईने मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा निर्धार सोडला नाही.

लहानपणी दुधाऐवजी दारूचे थेंब पाजून झोपवले जाणारे तेच बालक पुढे अभ्यासाच्या जोरावर नवोदय विद्यालयात पोहोचले. कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर दहावी-बारावीत उत्तम गुण मिळवत त्यांनी GS Medical College Mumbai येथे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला.
परंतु, डॉक्टर होण्याच्या वाटेवर असतानाच त्यांनी एक मोठा निर्णय घेतला — UPSC परीक्षा देण्याचा! दिवस-रात्र अभ्यास, इंटर्नशिप आणि संघर्ष यांच्या संगमातून त्यांनी UPSC उत्तीर्ण करत IAS पद मिळवलं. एका हातात MBBS पदवी आणि दुसऱ्या हातात IAS निकाल — ही त्यांची कामगिरी आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या यशाची खरी जाणीव आईला तेव्हा झाली, जेव्हा त्यांनी सांगितलं — “मी आता कलेक्टर झालो आहे.” गावकऱ्यांना ‘कलेक्टर’ म्हणजे काय हेही माहीत नव्हतं; काहींनी तर “आपला राजू कंडक्टर झाला” असं म्हणत
 आनंद साजरा केला!

२०१२ पासून प्रशासनात कार्यरत असलेले भारूड यांनी आदिवासी भागात शिक्षण, आरोग्य आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण काम केलं आहे. आता कोल्हापूर शहराचे आयुक्त म्हणून त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
आज ते सांगतात — “संघर्ष हा अडथळा नसतो, तोच तुमची ताकद असतो.”
भिल्ल समाजातील पहिल्या IAS अधिकाऱ्यांपैकी एक ठरलेले राजेंद्र भारूड हे आज लाखो तरुणांसाठी आशेचा किरण ठरले आहेत.
👉 संदेश स्पष्ट आहे:
परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि योग्य दिशा असेल तर यश अटळ आहे!
close