shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कष्टाच्या चिखलातूनच ज्ञानरूपी यशाची सुगंधी कमळे फुलतात: डॉ. सौ. मंजुताई शेरकर

वडाळा महादेव (वार्ताहर) :- ज्ञानशीलता प्राप्त करण्यासाठी उच्च ध्येयाची आणि सकारात्मक दृष्टीची गरज असते,अशा वाटेवर कष्टाच्या चिखलातूनच ज्ञानरूपी यशाची कमळे फुलतात, असे विचार छत्रपती संभाजीनगर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. मंजुताई अशोकराव शेरकर यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर येथील माऊली वृद्धाश्रम व माऊली जानकी नि राधार विद्यार्थी वसतिगृह,वाचन संस्कृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजचे आई, वडील, विद्यार्थी, शिक्षणप्रणाली आणि सेवाभावी आदर्श यासंदर्भाने आयोजित विचारदर्शनविषयी मनोगत व्यक्त करताना डॉ. मंजुताई शेरकर प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक हभप भागवतराव मुठे पाटील होते. माजी प्राचार्य शंकरराव अनारसे,माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत केले. माऊली वृद्धाश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी प्रास्ताविक करून संस्थेची वाटचाल विशद केली. डॉ. मंजुताई शेरकर यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले माझे वडील माजी प्राचार्य शंकरराव अनारसे यांचे ८८ वर्षाची जीवन वाटचाल म्हणजे शून्यातून निर्माण केलेले एक ज्ञानतपस्वी आदर्श शिल्प आहे.प्रतिकूल परिस्थिती होती तरी आम्हा मुलांना त्यांनी ज्ञान,सेवा, संस्कार,श्रमशीलता आणि माणुसकी शिकविली,माऊली वृद्धाश्रमात सुभाष वाघुंडे, सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी अनेक निरधारांना आपलेसे करुन ते सेवाकार्य करीत आहे, हेच खरे तीर्थस्थळ असल्याचे सांगून सर्व निराधार विद्यार्थ्यांना पुस्तके, भेटवस्तू,खाद्य पदार्थ दिले तर प्राचार्य शंकरराव अनारसे यांनी या सत्कार्यास धनादेश प्रदान केला. यावेळी प्राचार्य अनारसे लिखित शब्दवैभव पुस्तक सर्वांना भेट दिले.
प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी अध्यक्षीय सूचना करून मनोगत व्यक्त केल तर भाऊसाहेब गायधने यांनी मनोगत व्यक्त करून अनुमोदन दिले.डॉ. शिवाजी काळे यांनी प्राचार्य अनारसे याचा जीवनपरिचय करून दिला.आंतरभारती श्रीरामपूर शाखेचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष लिंगायत, माजी नायब तहसिलदार दत्तात्रय रायपल्ली, कवी, प्रा. राजेंद्र थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य टी.ई. शेळके यांनी प्राचार्य अनारसेअण्णा म्हणजे सेवा आणि ज्ञानाचे दीपस्तंभ असून त्यांनी कष्टातून जीवन फुलविले असल्याच्या आठवणी सांगितल्या. हभप भागवतराव मुठे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून ज्ञान, सेवा आणि भक्तीमुळे माणसाचे जीवन सुखी होते, हा जीवनमंत्र जपला पाहिजे असे आवाहन केले.अनाथ वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गाणी सादर करून मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पत्रकार, गृह रक्षक दलाचे राजेंद्र देसाई  भानुदास खरात  चंद्रकांत सूर्यवंशी, दत्तात्रय खिलारी, संतोष भालेराव,गिरमेकाका,वृद्ध मातापिता, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर शुभम नामेकर यांनी आभार मानले.

close