shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ. दत्ता विघावे यांना दिल्लीचा 'वाङ्मय विभूषण वैभव' राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त


नवी दिल्ली -
भाषा, साहित्य आणि समाजसेवेतील बहुमूल्य योगदानाबद्दल श्रीरामपूर (महाराष्ट्र) येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. दत्ता बाबूलाल विघावे यांना 'वाङ्मय कला संगम' (गुरुग्राम) तर्फे 'वाङ्मय विभूषण वैभव' या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. दिल्ली येथील हिंदी भवनमध्ये आयोजित 'सृजनाभिनंदनम् ४' - अलंकरण उत्सव २०२६ मध्ये या पुरस्काराची अधिकृत घोषणा करण्यात आली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑनलाईन स्वीकारला पुरस्कार

सदर सोहळा शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी नवी दिल्लीत पार पडला. मात्र, डॉ. दत्ता विघावे यांची प्रकृती सध्या अस्वस्थ असल्याने ते या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. संस्थेच्या वतीने त्यांना हा सन्मान ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात आला.
साहित्य आणि सामाजिक कार्याचा गौरव
डॉ. विघावे यांनी साहित्य, क्रीडा, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला आहे. राष्ट्र आणि समाजाला मूल्यांची जोड देत सांस्कृतिक समृद्धीसाठी त्यांनी केलेले कार्य गौरवास्पद असल्याचे प्रशस्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

मान्यवरांकडून अभिनंदन
वाङ्मय कला संगमाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनय कुमार सिंघल आणि संरक्षक डॉ. राकेश छोकर यांनी डॉ. विघावे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. या कार्यक्रमासाठी 'रोशनी किरण जन कल्याण समिती'चे श्री पंकज कुमार यांचे सहकार्य लाभले. डॉ. विघावे यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिक आणि क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात असून, त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
close