shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुसज्ज व्यायामशाळा व व्यायामाचे साहित्य मिळावे,गुंडेगाव येथील तरुणांची मागणी.

वाळकी प्रतिनिधी(दादासाहेब आगळे):अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव गावांमध्ये अजुनही अद्ययावत व्यायामशाळा नसल्याने तरुण होतकरु मुलांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून गावात व्यायामशाळा व व्यायामाचे साहित्य मिळावे अशी मागणी तरुण वर्गातून केली जात आहे. 

         व्यायाम साहित्य बाबत गुंडेगावातील तरुणांनी अनेक वेळा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य यांच्याकडे अनेकदा मागणी केली आहे.गुंडेगाव हे अंदाजे सात हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात आजच्या परिस्थितीत जवळपास २०० मुले नेव्ही, पोलीस व सैन्यदलात भरतीसाठी सराव करत आहेत. तर काही मुले चांगले कुस्तीपटू असून त्यांनी गावापासून तर राज्यपातळीवर आखाडा गाजवला आहे. विशेष म्हणजे ही मुले कष्टकरी, शेतकरी, शेतमजूरांची असल्याकारणाने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.यामुळे फी भरणे शक्य नसल्याने ते जिममध्ये व्यायामासाठी जाऊ शकत नाहीत. म्हणून हे गुंडेगाव येथील नवतरुण सकाळी व संध्याकाळी मिळेल त्या रस्त्यावर जाऊन धावण्याच्या (रनिंग) करुन घेतात मात्र इतर कसरती व्यायाम करण्यासाठी त्यांना व्यायामशाळा व व्यायामाचे साहित्याची गरज भासत आहे.
       गुंडेगाव येथे मागील काळात व्यायामशाळा बांधण्यात आली आहे. मात्र व्यायामाचे साहित्य मिळाले नसल्याने या व्यायामशाळेकडे कुणीही लक्ष न दिल्यामुळे या व्यायामशाळेवर दारुडे, जुगारी व गांजा पिणाऱ्यांनी ताबा मिळवत या व्यायाम शाळेचा अवैध वापर करून जुगाराचा अंड्डा सुरू केला होता. परंतु गावातील काही तरुणांनी या लोकांना हाकलून लावत व्यायामशाळा ताब्यात घेऊन तिची स्वखर्चाने साफसफाई करून सुधारणा चे थोडेफार काम केले आहे.
           ही व्यायाम शाळा व्यवस्थित झाल्यानंतर या व्यायाम शाळेत व्यायामाचे साहित्य त्वरित मिळावे अशी मागणी येथील तरुणांनी केली आहे. तरुणांच्या मते आम्हाला व्यायामाचे साहित्य मिळाले तर आम्ही चांगल्या प्रकारे व्यायाम करून शारीरिकदृष्ट्या दृष्ट्या सक्षम होऊन नेवी, सैन्यदल व पोलीस सेवेत सामील होऊन देश सेवा करण्यासाठी कामी येऊ असे मत व्यक्त केले तसेच व्यायाम हा प्रत्येकाने केला पाहिजे कारण शरीर हीच संपत्ती असे म्हटले जाते म्हणून फक्त नोकरी किंवा भरती करणारांनीच व्यायाम करावा असे नसून बालवयापासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनी व्यायाम केल्यास नक्कीच आपले शरीर सुदृढ सशक्त व निरोगी राहील म्हणून सगळ्यांनी व्यायामाकडे वळावे असे मत गुंडेगाव येथील तरुणांनी मांडले आहे. म्हणून ग्रामपंचायतीने लवकरात लवकर पाठपुरावा करू आम्हाला व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणीगौरव मुदगुले, संस्कार सकट,पवन कोतकर,अथर्व खाकाळ,सोहम मुदगुले,मनिष पिंपरकर,यश चौधरी, मंगेश चौधरी,अनुज झरे,चैतन देवकर, प्रशांत माने,ओम हाताळणे, संकेत पवार आदी तरुण वर्गातून केली आहे.

close