shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चारधाम यात्रेनंतर रत्नाबाई जिरे यांचा जिरेमाळी समाजातर्फे भव्य सत्कार


आध्यात्मिक प्रवासाची यशोगाथा; न्याहळोदमध्ये गौरवाचा सोहळा उत्साहात संपन्न

नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील रत्नाबाई नारायण जिरे यांनी पवित्र चारधाम यात्रेचा यशस्वी व सुखरूप प्रवास पूर्ण करून गावात परतताच जिरेमाळी समाजातर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. श्रद्धा, भक्ती आणि आत्मिक समाधानाने परिपूर्ण असलेल्या या यात्रेनंतर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
या प्रसंगी रत्नाबाई जिरे यांना पुष्पहार, शाल व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या आध्यात्मिक प्रवासाबद्दल समाजबांधवांनी अभिमान व्यक्त करत त्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे, चारधाम यात्रेसोबतच त्यांनी नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिर, तसेच अयोध्या आदी पवित्र धार्मिक स्थळांना भेट देत विविध ठिकाणी दर्शन घेतले. या संपूर्ण यात्रेदरम्यान त्यांनी घेतलेला आध्यात्मिक अनुभव हा प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.सत्कार समारंभात मान्यवरांनी रत्नाबाई जिरे यांच्या दृढ श्रद्धा, चिकाटी आणि धार्मिक निष्ठेचे विशेष कौतुक केले.
अशा प्रकारच्या यात्रेमुळे केवळ मन:शांती मिळत नाही, तर समाजात सकारात्मक ऊर्जा आणि धार्मिक संस्कारांची जपणूक होते, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपा पिंपळनेर मंडळाचे उपाध्यक्ष दिलीपराव घरटे, पुरोगामी पत्रकार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजयराव महाजन, सामाजिक कार्यकर्ते नारायणराव जिरे, साई संस्थान संरक्षण विभागातील उद्धव जिरे, 'सकाळ'चे पत्रकार विशाल रायते, शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्त्या शोभना महाजन, अंगणवाडी शिक्षिका शालिनी घरटे, कुशल गृहिणी नीताताई रायते तसेच समर्थ जिरे व श्रद्धा जिरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण होते. या सोहळ्यामुळे समाजात एकात्मता आणि धार्मिक भावनेला अधिक बळ मिळाल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त झाली.
close