शैक्षणिक व सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर राहणारे देहरे, अहिल्यानगर येथील डॉ. सुहास बाबासाहेब पाखरे यांचा वाढदिवस (२१ एप्रिल) उत्साहात साजरा होत आहे. सध्या नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, नायगाव पुणे मध्ये एमबीए विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. पाखरे यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
डॉ. पाखरे हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता विविध सामाजिक उपक्रमांतही सक्रिय सहभाग घेतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणे, करिअर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे, तसेच समाजातील गरजू घटकांना मदत करणे यामध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो.
त्यांच्या नेतृत्वाखाली एमबीए विभागाने शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन व कौशल्यविकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण व सामाजिक भान निर्माण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.
त्यांना आत्तापर्यंत १८ वर्षाच्या शैक्षणिक प्रवासात विविध प्रकारचे राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेली आहेत. आत्तापर्यंत १०-१२ देशांमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांबरोबर संशोधन पर हितगुज केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे चे पीएचडी मार्गदर्शक म्हणून सुद्धा कार्यरत आहे.
नवसह्याद्री शैक्षणिक संकुलाच्या प्रगतीच्या आलेखामध्ये सुद्धा त्यांचा हातभार आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, विद्यार्थी व मित्रपरिवार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. समाजोपयोगी कार्याची हीच परंपरा पुढेही कायम राहो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



