shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे पुरस्कार घोषित ..ॲङ्. बाळासाहेब तनपुरे,ॲङ्. हरिश्चंद्र नाईक, सौ. विठाबाई वने/ शेटे, प्रा. पोपटराव पटारे, संतोष लेंभे मानकरी

श्रीरामपूर(वार्ताहर): येथील शिरसगाव भागातील इंदिरानगर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाले असून हे पुरस्कार बुधवार दि. १५ एप्रिल २०२६ रोजी प्रदान करण्यात येतील असे प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सांगितले.


   वाचन संस्कृती प्रतिष्ठानची स्थापना जागतिक पुस्तक दिनी २३ एप्रिल २००६ रोजी झाली. या प्रतिष्ठानच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार पुढील मान्यवरांना घोषित झाले आहेत. ०१) पत्रकार,ॲङ्. बाळासाहेब(यशवंत) केरुजी तनपुरे, श्रीरामपूर लिखित *कटूसत्य* आत्मचरित्र, 
०२) रयत शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक, ॲङ्. हरिश्चंद्र फकिरचंद नाईक लिखित *थापी आणि ओळंबा* आत्मचरित्र,
०३ ) सौ. विठाबाई राजाराम वने/ शेटे, ब्राह्मणी लिखित *शब्दफुले* कवितासंग्रह
०४) प्रा. पोपटराव नामदेव पा. पटारे, टाकळीभान लिखित *कणीस* कवितासंग्रह
०५ ) श्री. संतोष रंगनाथ लेंभे, छत्रपती संभाजीनगर लिखित *ढेकूकाठ* रावसाहेब मनाजी शेळके चरित्र 
  या पुस्तकांना वाचन संस्कृती राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती २० २६ पुरस्कार समितीने घोषित केले. पुरस्कार समिती अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी एकनाथ काळे, सदस्य कवयित्री संगीता चंद्रभान फासाटे/ कटारे, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ग्रंथ निवडीत भाग घेतला. १५ एप्रिल २०२६ रोजी आयोजित श्रीसंत गोरा कुंभार यांच्या ७०९ पुण्यतिथी सोहळक्याप्रसंगी श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार व वाचन संस्कृती ग्रंथ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील असे कोषाध्यक्ष सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी सांगितले.
close