शिर्डी प्रतिनिधी:
मित्रत्व, आपुलकी आणि आनंदाचा संगम असलेल्या वातावरणात शुभम भोर यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मित्रपरिवाराने एकत्र येत त्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्याविषयी आदर व प्रेम व्यक्त केले.
कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रीन फाउंडेशनचे उपाध्यक्ष तुषार दादा महाजन, सागर जेजुरकर, संदीप थोरात यांसह अनेक मान्यवर व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शुभम भोर यांचा सत्कार केला व वर्षाव करून त्यांच्या आयुष्यातील या खास दिवसाला अधिकच अविस्मरणीय बनवले.
यावेळी पत्रकार तुषार महाजन यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की,
"शुभम भोर हा तरुणाईसाठी एक उत्तम आदर्श आहे. त्याची मेहनत, जिद्द आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे तो निश्चितच भविष्यात मोठे यश संपादन करेल. त्याच्यासारखे मित्र आयुष्यात असणे ही अभिमानाची बाब आहे."
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी शुभम भोर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. वातावरण आनंद, उत्साह आणि मैत्रीच्या रंगात रंगले होते.

