shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अभिनव शिक्षण संस्थेची दैदिप्यमान झेप; JEE Mains मध्ये ९१ विद्यार्थ्यांचे यश


पुणे : गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या अभिनव अॅकेडेमीने यंदा अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या JEE Mains परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेतील तब्बल ९१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावत संस्थेचा नावलौकिक उंचावला आहे.

देशभरातील अनेक नामांकित संस्थांच्या तुलनेत सरासरी यशाचे प्रमाण १५ टक्क्यांच्या आसपास असताना, अभिनव अॅकेडेमीने तब्बल ४० टक्के यशाचे प्रमाण गाठत नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात या संस्थेची दैदिप्यमान कामगिरी विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
या यशामागे अजित पोवार-कौलगेकर यांची दूरदृष्टी, अथक परिश्रम, धाडसी निर्णयक्षमता आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टीकोन कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. एका वडार युवकाने शिक्षण क्षेत्रात एवढी मोठी भरारी घेत सुमारे ६० कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारलेली ही संस्था आज प्रेरणास्थान बनली आहे.
अभिनव अॅकेडेमीच्या गुणवत्तापूर्ण कार्याची दखल घेत नुकतीच राज्य शासनाने संस्थेला विशेष मान्यता प्रदान केली आहे. या कार्यामागे राजकुमार अलकुंटे यांचे मोलाचे योगदान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तसेच मंत्रालयातील सुधीरजी पवार व सर्व सहकाऱ्यांचेही विशेष आभार मानण्यात आले.
वडार समाजासाठी अभिमानास्पद ठरलेल्या या यशामुळे सर्व स्तरांतून अजित पोवार-कौलगेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, “विद्यश्री अजित पोवार-कौलगेकर यांना सलाम” अशा भावना व्यक्त होत आहेत.
close