shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अभिष्टचिंतन मनोजभाऊंचे…!आणि त्यांच्या निःस्वार्थ पत्रकारितेच्या प्रवासाचे …!!


ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्रीरामपूर नगरीत जन्मलेल्या एका निर्भीड, प्रामाणिक आणि निःस्वार्थ पत्रकाराचा आज वाढदिवस…!

आमचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आणि ज्येष्ठ पत्रकार कै. शंकरराव आगे यांचे चिरंजीव तथा ज्येष्ठ पत्रकार मनोजभाऊ शंकरराव आगे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभिष्टचिंतन…!

सन १९८४ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनोजभाऊंनी आपल्या परखड लेखणीच्या माध्यमातून समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि गोरगरीबांवरील अत्याचारांविरोधात कायम आवाज उठविला. निर्भीड पत्रकारिता, प्रामाणिकपणा, निःस्वार्थ वृत्ती, इमानदारी आणि समाजहिताची भूमिका हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे वैशिष्ट्य राहिले आहे.

त्यांच्या “जयबाबा” या दैनिकातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फुटली. गेल्या तब्बल ४२ वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रवासात त्यांनी कधीही तडजोड केली नाही. सत्यासाठी लढण्याचा त्यांचा बाणा आजही कायम असून वयाच्या साठीतही त्यांची कार्यतत्परता अनेक तरुण पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे.
हिंदुत्वाचा भगवा विचार, समाजकारणाची जाण आणि अभ्यासपूर्ण लेखनशैली यामुळे मनोजभाऊंची ओळख आज केवळ अहिल्यानगर जिल्ह्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्यभर निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आजही ते नियमित व्यायाम करतात, निरोगी जीवन जगतात आणि सतत वाचन, चिंतन व सामाजिक घडामोडींवर अभ्यास करत असतात.
छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या लेखणीत आणि आचरणात स्पष्टपणे जाणवतो. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक बातमीत अभ्यास, सामाजिक भान आणि सत्याची ताकद दिसून येते.
माझ्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे की, गेल्या पंचवीस वर्षांपासून मनोजभाऊंसोबत माझे जिव्हाळ्याचे संबंध असून माझ्या पत्रकारितेच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. पत्रकार म्हणून मी जे काही छोटे-मोठे नाव कमावले आहे, त्यामागे साईबाबांचे आशीर्वाद आणि आगे कुटुंबियांची प्रेरणा असल्याची भावना मी कायम मनात बाळगतो.
याचीच पावती म्हणून ज्येष्ठ पत्रकार कै. शंकरराव आगे यांनी माझ्या कामाची दखल घेत मला सन २०१६ मध्ये श्रीरामपूर तालुक्यातील प्रतिष्ठेचा “वसंतराव देशमुख शोध पत्रकारिता पुरस्कार” प्रदान करून गौरविले होते. तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातील अविस्मरणीय प्रेरणादायी क्षण ठरला.
आज मनोजभाऊंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गौरवशाली जीवनप्रवासाविषयी काही शब्द लिहिताना मनापासून अभिमान वाटत आहे. त्यांच्या विचारांची प्रेरणा आणि आशीर्वाद असेच कायम लाभत राहो हीच साईचरणी प्रार्थना…!
आदरणीय ज्येष्ठ पत्रकार मनोजभाऊ आगे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
साईबाबा त्यांना निरोगी, आनंदी, सुखसमृद्ध आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना…!

पत्रकार राजेंद्र भुजबळ
शिर्डी MIRROR
संचालक तथा मुख्य संपादक, शिर्डी

close