पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
वडार समाज महाराष्ट्र मजूर शिल्प प्रतिष्ठान यांच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आले. 2011 ला शिल्पाचे अनावरण झाल्यापासून गेल्या 15 वर्षापासून कामगार दिनाला समाजाचे तोरण बांधून प्रतिष्ठान च्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, कला, साहित्य, राजकीय विविध क्षेत्रातील समाज बांधवाचे शिल्पकार गौरव, गुणगौरव,सत्कार मूर्ती उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार केला जातो यंदाही वैष्णवी जाधव,प्रतिक्षा पवार, भिमा पवार, मच्छिंद्र चव्हाण, रामू लष्करे, सचिन भोसले, राजू चव्हाण (गुजरात) यांचा सन्मान चिन्ह व सोलापूर कापडी गुलदस्ता देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक टि. एस. चव्हाण तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पश्चिम महाराष्ट्र विभागाचे मुख्य अभियंता. श्री. कालिदास भांडेकर, भारतीय सैनिक कर्नल रूषीकेश धोत्रे उपस्थित होते. वडार मजूर दाम्पत्य शिल्पास विधानपरिषद आमदार अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, कला,क्रिडा, साहित्य व सांस्कृतिक सभापती कैलास कुटे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थानिक नगरसेवक कुशाग्र कदम,नगरसेविका वैशाली काळभोर,अश्विनी वाबळे राहुल पाटील, विशाल काळभोर,दत्ता देवतरसे उपस्थित होते.
सर्वांनी मिळून दीपप्रज्वलन, व महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्वर्गीय गायिका आशा भोसले, बाबा आढावा या सर्वांना श्रध्दांजली अर्पण केले तदनंतर महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रम आरंभ केले प्रसत्विक भाषण संस्थापक अध्यक्ष शामराव विटकर यांनी केले त्यानंतर महापौर रवी लांडगे यांनी आपल्या भाषणात वडार समाजाचे इतिहास व पिंपरी चिंचवड शहर घडवण्यासाठी दिलेले योगदान याचा उल्लेख केला आजचा दिवस दुग्धशर्करा आहे कारण बौध्द पोर्णिमा, महाराष्ट्र दिन, कामगार दिन, मराठी भाषिक दिन हा एकाच दिवशी आले असे सांगितले त्यांनी सगळ्याचे आभार मानले. त्यानंतर भाऊसाहेब भोईर यांनी वडार समाजाशी माझे नाते आहे मी पण यांच्यातील एक आहे कारण तळेगाव माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे हे माझे गुरू बंधू आहेत त्यामुळे समाजाशी माझे नाते आहे वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान दरवर्षी चांगले उपक्रम घेते त्यांनी खूप कौतुक केले. त्यानंतर उपमहापौर यांनी दाम्पत्य शिल्प छान आणि पिंपरी चिंचवड जडणघडणीचा वास्तविकता दर्शवणारी प्रतिमा असल्याचे सांगितले. सभापती कैलास कुटे यांनी वडार मजूर दाम्पत्य शिल्पाच्या कार्यक्रम साठी शुभेच्छा दिल्या तसेच कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक विभाग त्यांच्या कडे असल्याने त्यांच्या पदाचा खरा सन्मान या कार्यक्रमासाठी उपयोगी ठरल्याचे समाधान वाटले येणाऱ्या काळात अजून काही सांस्कृतिक कार्यक्रम संस्थेचे वतीने राबविले तर नक्कीच पाहिजे ते मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. समाजातील भारतीय सैनिक कर्नल धोत्रे यांनी कर्नल पदावर कसे गेले व त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या कार्य संगितले समाजातील तरूणांनी सैन्य मध्ये जावे असे मार्गदर्शन केले. एकता परिषद चे अध्यक्ष भरत विटकर यांनी समाजाचे इतिहास समाजातील लोकांनी नेमके काय करावे याच्या वर व्याखान दिले. यावेळी मंत्रालय टिम सुधीर पवार, नितीन आण्णा धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पवार, नवी मुंबई सागर चौगुले, संदीप शिंदे, सोलापूर रवी शिंदे,विष्णू चौगुले,शिर्डी एक्सप्रेस चे संपादक रमेश जेठे, पुणे चे मा उपमहापौर मुकारी आलगुडे,संदीप पवार, हरिष बंडीवडार, अशोक पवार, सदाशिव जाधव, बाळासाहेब भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार सचिव लखन पाटकर यांनी केले तर सन्मान चिन्हे सौजन्य अनिल विटकर तर सूत्रसंचालन अर्मताश्वरी यांनी केले.
संयोजन :- अध्यक्ष नागेश पवार, सहसचिव अमर दौंडकर, सागर ओरसे,पिंटू जाधव, अनंत नलावडे,
राजु कुसाळकर, सुनिल शेलार,दिलिप मुरकुटे अन्य कार्यकर्त होते

