shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाजातील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


*सांगली :- अनिल पवार 

   जयसिंगपूर ( कोल्हापूर ) वडार समाजातर्फे सालाबादप्रमाणे अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, 10वी, 12 वी, प्रथम श्रेणित पास झालेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार व क्रांतिवीर   उस्ताद लहुजी साळवी सेवभावी संस्था वडार समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्याचा पुरस्कार देऊन गौरव केला. 

 आयोजक : श्री सचिन मनोहर भोसले. अध्यक्ष मी वडार महाराष्ट्राचा विद्यार्थी गौरव समिती यांनी 
 याही वर्षी 10 वी12 वी तील विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास  अध्यक्ष म्हणून श्री सुनील चव्हाण सर होते. तसेच जयसिंगपूर चे उपनगराध्यक्ष सौ अनुराधा आडके नगरसेवक व जिल्हाध्यक्ष श्री अर्जुन देशमुख. नगरसेवक महेश कलकुटगी. नगरसेविका गीता भोसले. नगरसेविका स्वाती मादनाईक. शामराव विटकर वडार मजूर शिल्प अध्यक्ष. विष्णू चौगुले सोलापूर .निळू शिंगाडे. नितीन साळुंखे. सुरेश शिंगाडे. बाळकृष्ण पवार सर. अमोल वडार. सुभाष पवार. परशु शिंगाडे. राजू जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
close