नगर प्रतिनिधी:
न्याहळोद धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील नामांकित पहे लवान श्री.कैलास अहिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नुकतीच निवड झाली असून ते सध्या मा.मुख्यमंत्री साहेबांकडे कार्यरत आहेत. म्हणून आदिवासी विकास संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मोतीलाल सोनवणे व इतर पदाधिकारी ज्ञानेश्वर पाटील, धनराज खैरनार,शिवाजी पाटील, प्राचार्य किरणकुमार चव्हाण,रवी पाटील,दर्यवसिंग गिरासे,गणेश पाटील सर,मनोहर भारती, मधुकर वाघ,अशोक सूर्यवंशी, पिंटू अहिरे,यांनी त्यांच्या सत्कार केला.
या जगात कैलास अहिरे सारखी काही माणसे जन्माला येतात ते विजयाच्या व कर्तुत्वाच्या झेंडा हाती घेऊनच.जीवनाचं सोनं करण्यासाठी,स्वतःचा जन्माच सार्थक करण्यासाठी,आपल्या उद्धारासाठी आणि पर्यायाने जनतेच्या उद्धारासाठी त्यांचा जन्म होत असतो आणि ते विजयाची साक्ष देणारे स्तंभ होतात.जनतेचे आधारस्तंभ होतात.जन्म येणे देवा हाती पण जन्माचे सोनं करणे ही मान्य कृती असं सर्वसाधारणपणे म्हटले जाते कैलास अहिरे बाबतीत हे तंतोतंत लागू पडते.
कुस्तीची आवड असणारे, मेहनती,जिद्दी,संघर्ष योद्धा,आज गावाची शान,परिवाराच्या मान मोठा करणारे पोलीस ते साहेब हा सन्मान मोठा ऐतिहासिक वाटतो. त्यांच्याकडे प्रचंड लोक संग्रह असून एक प्रेमळ,निर्मळ,उदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची खास ओळख असल्याचे प्रा.मोतीलाल सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

