shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त श्री साईबाबा महाविद्यालयात जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न

नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून श्री साईबाबा महाविद्यालयात २५ मीटर व ५० मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी करण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत शैक्षणिक संकुलातील विविध विभागांतील एकूण ४६ खेळाडूंनी सहभाग नोंदवत आपले जलतरण कौशल्य प्रदर्शित केले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोरक्ष गाडीलकर साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. भीमराज दराडे साहेब, प्रशासकीय अधिकारी मा. संदीपकुमार भोसले साहेब, प्रशासकीय अधिकारी मा. अतुल वाघ साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष औताडे, मुख्यद्यापिका मिरजकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक चळवळीचा इतिहास, क्रीडा क्षेत्रातील शिस्त, समर्पण आणि निरोगी जीवनासाठी खेळांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत स्पर्धेत चुरशीची लढत दिली. जलतरण तलाव परिसरात खेळाडूंच्या कामगिरीला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

स्पर्धेचे नियोजन व आयोजन क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक डॉ. विक्रम सातपुते, क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र कोहकडे, श्री. रविंद्र गव्हाळे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.

*स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :*
*इंग्लिश मीडियम स्कूल (प्राथमिक विभाग)– अंडर १४ गट (२५ मीटर फ्रीस्टाईल)*
प्रथम – अथर्व संदीप थोरात (इयत्ता ७ वी 'ब')
द्वितीय – श्लोक संतोष सौदागर (इयत्ता ७ वी 'क')
तृतीय – साईराज संतोषकुमार माने (इयत्ता ७ वी 'क') व साई विलास शिंगार (इयत्ता ७ वी 'अ')
*इंग्लिश मीडियम स्कूल (माध्यमिक विभाग) – अंडर १७ गट (५० मीटर फ्रीस्टाईल)*
प्रथम – सिद्धांत संदीप डांगे (इयत्ता ९ वी)
द्वितीय – साईश संदीप राऊत (इयत्ता ९ वी)
तृतीय – श्रेयश गणेश जाधव (इयत्ता ९ वी)

*कन्या विद्यामंदिर – अंडर १४ गट (२५ मीटर फ्रीस्टाईल)*
प्रथम – वेदिका सोमनाथ वाणी (इयत्ता ७ वी)
द्वितीय – आरोही शिवाजी साप्ते (इयत्ता ७ वी)
तृतीय – रिया प्रमोद पाठक (इयत्ता ९ वी)

*वरिष्ठ महाविद्यालय – खुला गट (५० मीटर फ्रीस्टाईल)* 
प्रथम – ऋषिकेश ज्ञानदेव आव्हाड (टी.वाय.बी.एस्सी.)
द्वितीय – अंकुश मोती खान (एस.वाय.बी.ए.)
तृतीय – करण साईनाथ सातदिवे (टी.वाय.बी.कॉम.)

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जलतरण क्रीडेबाबत रुची निर्माण होण्यास मदत झाली असून ऑलिम्पिक मूल्ये, क्रीडाभावना आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला. उपस्थित मान्यवरांनी सर्व विजेते, सहभागी खेळाडू व आयोजकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
close