shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सदस्यांचा सामूहिक वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न

दिनांक : २ जुलै २०२६

अमरावती : संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ, अमरावतीच्या वतीने माहे जून व १ जुलै २०२६ रोजी वाढदिवस असलेल्या सभासदांचा सामूहिक वाढदिवस कार्यक्रम विद्युत नगर येथील हनुमान मंदिरामध्ये मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष तथा पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभाग, अकोला/अमरावतीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाचे राष्ट्रीय सहसचिव मा. श्री. पुरुषोत्तम गावंडे होते. व्यासपीठावर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. वासुदेवराव उमाळे, उपाध्यक्ष श्री. दामोदर पवार, मनपाचे स्वीकृत नगरसेवक मा. भोजराज काळे, महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मा. दिलीप कडू, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती अध्यासन केंद्रा चे अध्यक्ष मा. प्रा. दिलीपराव काळे, मा. सुरेशराव अंधारे अध्यक्ष हनुमान ट्रस्ट विद्युत नगर अमरावती, प्राध्यापक मा. गजानन ठाकरे, बाल व्याख्याता कु. आराध्या ठाकरे, ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीपसिंह खांबरे, माजी अध्यक्ष डॉ. सतीश तराळ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री हनुमानजीला पुष्पमाला अर्पण करून तसेच वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला हारार्पण करून झाली. ज्येष्ठ कीर्तनकार सौ. छायाताई पाथरे यांनी आपल्या मधुर आवाजात सानेगुरुजींची 'खरा तो एकचि धर्म' ही प्रार्थना सादर केली. त्यानंतर मान्यवरांचे  मंडळाचे पदाधिकारी यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 
प्रास्ताविकात श्री. दामोदर पवार यांनी मंडळाच्या स्थापनेपासून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. आरोग्य शिबिर, आयुष्यमान व वय वंदन कार्ड तसेच एस. टी. महामंडळाचे स्मार्ट कार्ड काढण्याचे शिबिरे घेण्यात आली असून अनेक गरजूंनी लाभ घेतला. गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये शांतता परिषद व मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीच्या सभेमध्ये ज्येष्ठांचे प्रश्न व त्यावरील उपाययोजना बाबत झालेल्या चर्चेची विस्तृत माहिती दिली. संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे कार्य हे अभिनव असल्याने मंडळाला दोन पुरस्कार मिळाले असल्याचे सांगितले. अमरावती शहरामध्ये ४४ ज्येष्ठ नागरिक संघ असून शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात जवळपास १३ % ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना विरंगुळ्यासाठी शहरामध्ये एक ज्येष्ठ नागरिक कल्याण भवन असावे, यासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त केले.

त्यानंतर सामूहिक वाढदिवसासाठी उपस्थित असलेल्या ज्येष्ठांचा मंडळाचा मानाचा दुपट्टा, गुलाबपुष्प व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये मंडळाचे कोषाध्यक्ष सर्वश्री धनराज निपाने, अनिलराव वानखडे, रामराव घोळस्कर, अशोकराव अर्डक, देविदास गेडाम, बापूराव अकोलकर, किशोर रघुवंशी, रमेश वऱ्हाळे, उत्तमराव जावरे, अरविंदराव धरपाळ, सुरेशराव विधळे, भीमराव वंदे, नामदेवराव राऊत, हरदिपसिंह सलुजा, रामभाऊ सिनकर, प्रदीपराव सगणे, काशिनाथ चौधरी, प्रमोद धोटे, दिनेश बागल, ओंकारराव डाखोरे, श्रीकृष्ण बोबडे, अरविंदराव धर्माळे, सौ. प्रभाताई धर्माळे, अनिल गौपाल, रामराव कनेरकर, श्रीकृष्ण बाकडे, मुरलीधर मेहरे, शरदराव पाथरे, उत्तमराव जावरे, नारायणराव डवरे, श्रीधरराव काळे, प्रभाकरराव डहाके, रामकृष्ण वानखडे यांचा यथोचित सत्कार करून मंडळाकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवर स्वीकृत नगरसेवक मा. श्री. भोजराज काळे, प्रा. गजानन ठाकरे, मा. दिलीप काळे, सुरेशराव अंधारे, मा. अशोकराव अर्डक यांनी आपल्या मनोगतात मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. तेरा वर्षांची मुलगी कु. आराध्या ठाकरे हिने शिवचरित्रावर उत्कृष्ट प्रबोधन केले. एवढ्या लहान वयात उत्कृष्ट संचालन व प्रवचन ती करते. या नेत्रदीपक कार्याबद्दल प्रा. दिलीपसिंह खांबरे यांनी कु. आराध्याचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन तिचा गौरव केला. सत्कार करताना खांबरे सर म्हणाले, "आराध्या ही माझा विद्यार्थी प्राध्यापक गजानन ठाकरे यांची मुलगी आहे. तिच्या कर्तृत्वाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. प्रतिभा, प्रज्ञा, कलागुणांनी सुसंस्कृत भरारी घेणाऱ्या, उभारी घेणाऱ्या आराध्याचे अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी हृदयापासून शुभेच्छा!" त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम गावंडे यांनी वाढदिवस असलेल्या सर्व ज्येष्ठांना शुभेच्छा दिल्या. वयोमानानुसार ज्येष्ठांना अनेक आजार असतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी आहार, विहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. आपण सर्वांनी सकाळी एक तास व्यायाम, योगा करावा. ज्येष्ठ नागरिक केवळ कुटुंबाचे किंवा समाजाचे नव्हे तर देशाचे आधारवड आहेत, याची शासनाने दखल घेणे आवश्यक आहे. शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले, पण त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. राज्यस्तरीय फेस्कॉमच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांविषयी शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. नुकतेच राज्यातील आमदार महोदयांना जिल्हानिहाय ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे निवेदन दिलेले आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व आमदार महोदयांना ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. दोन्ही सभागृहांमध्ये ज्येष्ठांच्या मागण्यांवर लक्षवेध घेऊन त्यावर निर्णय व्हावा, अशी ज्येष्ठ नागरिकांची अपेक्षा आहे.
कार्यक्रमामध्ये नुकतेच निधन झालेले नुटाचे संस्थापक व पदवीधर मतदारसंघाचे तीन दशके नेतृत्व करणारे व विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले लढवय्ये माजी आमदार आदरणीय बी. टी. देशमुख सर, मंडळाचे ज्येष्ठ सभासद प्रा तथा संचालक विरेंद्र सोवितकर व ज्ञात-अज्ञात दिवंगतांना मंडळाकडून दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली देण्यात आली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट व बहारदार संचालन माजी सचिव श्री. प्रभाकरराव उ मक यांनी तर आभार प्रदर्शन मंडळाचे कर्तबगार सचिव योगगुरू डॉ. चंदनसिंह राजपूत यांनी केले. कार्यक्रमामध्ये प्रभुदास फंदे यांनी गीत गायनातून सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्री. काशिनाथ फुटाणे यांनी ग्राम जीवन विकास परीक्षा अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते वितरित केली.
कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी श्रीकृष्ण कुलट, श्री. राजाभाऊ देशमुख, इजि. संजय खोंडे, योग प्रशिक्षक नीताताई खोंडे, पुष्पाताई साखरे, अनिलराव वानखडे,  गजेंद्र पाथरे, मधुकरराव भोपाळे, दिपकराव जुनघरे, डॉ. वसंतराव जामोदे, भास्कर रिठे, सुरेश शिर्के, अशोक हांडे, नरेंद्र तायडे आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. चहा-नाश्ता सभेपूर्वीच झाला. ग्रामगीताचार्य चोरे दादा व श्री कनेरकर व काशिनाथ फुटाणे यांच्या सुमधुर आवाजातील राष्ट्रवंदनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

*डी. एस. पवार*  
उपाध्यक्ष
संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ, अमरावती

close