shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिव्यांगाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा - संजय साळवे

शौकतभाई शेख/श्रीरामपूर : 
दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून साळवे परिवार गेल्या २५ वर्षापासून सातत्यपूर्ण दिव्यांगांना आपल्या न्याय व हक्कासाठी क्षितिजा पलीकडील विश्व निर्माण करण्याची संकल्पना राबवित आहेत.आपल्या उत्पन्नातील काही भाग दिव्यांगांच्या सेवेसाठी अर्पण करणे हा आदर्श पायंडा त्यांनी निर्माण केला आहे.अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आपण समाजाप्रती आपलं उत्तरदायित्व सिद्ध करणे गरजेचे असते.असे गौरवशाली प्रतिपादन दिव्यांगांना तीन चाकी सायकल,व्हीलचेअर व बॅटरीवरील सायकल वितरण सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन करताना अध्यापिका सुनीता नागरे यांनी केले.

             अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सहर्षा हॉल,बोंबले पाटील नगर या ठिकाणी दिव्यांगांना तीन चाकी सायकल, व्हीलचेअर व बॅटरी वरील सायकल वितरण सोहळा व दिव्यांग मतदार सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम संपन्न झाला.
           कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवडणूक शाखा नायब तहसीलदार सौ.हेमलता वाकडे या होत्या.कार्यक्रमासाठी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, सचिव वर्षा गायकवाड, संचालिका सहर्षा साळवे,प्रांत कार्यालयाचे स्वीप नोडल अधिकारी गणेश पिंगळे, निवडणूक शाखेचे संदीप पाळंदे,सुधाकर बागुल, आसान दिव्यांग संघटनेच्या खजिनदार सौ.साधना चुडीवाल, समन्वयक भरत चुडीवाल, विनोद कांबळे सर,यांची प्रमुख उपस्थित होती.
           याप्रसंगी स्वीप नोडल अधिकार गणेश पिंगळे यांनी दिव्यांग मतदार सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार हेमलता वाकडे यांनी दिव्यांग मतदार जनजागृती संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी दिव्यांग मतदारांचे फॉर्म भरून घेण्यात आले.
                जिल्हा व्यवस्थापन समिती सदस्य संजय साळवे यांनी दिव्यांगांना शासकीय योजना व त्या संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.याप्रसंगी कु.रोहिणी गायकवाड यांनी स्वागत गीत सादर केले.तर अंधकलाकार विनोद कांबळे सर यांनी विनोदी कविता सादर केली. स्व.संजय नागरे यांच्या स्मरणार्थ दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळवे व गणेश पिंगळे यांनी केले.तर आभार वर्षा गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आसान दिव्यांग संघटनेचे उपप्रदेशाध्यक्ष सुनील कानडे, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे, दत्तनगर शाखेचे उपाध्यक्ष महेंद्र दिवे,कारेगांव शाखेचे अध्यक्ष महादेव कनगरे, तालुकाध्यक्ष किशोर ताठे,खोकर शाखेचे कादीर शेख,सौ.प्रमिला कानडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close