shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चि. सर्वेश सचिन सोनवणे याची जवाहर नवोदय विद्यालयात निवड; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

चि. सर्वेश सचिन सोनवणे याची जवाहर नवोदय विद्यालयात निवड; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

शिर्डी प्रतिनिधी : (तुषार महाजन)

पिंपळनेर येथील श्री. सचिन साहेबराव सोनवणे यांचे सुपुत्र चि. सर्वेश सचिन सोनवणे (इयत्ता आठवी) याची प्रतिष्ठित जवाहर नवोदय विद्यालय, नकाणे येथे प्रवेशासाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे सोनवणे कुटुंबासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चि. सर्वेशने आपल्या मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेश ही अत्यंत प्रतिष्ठेची बाब मानली जाते. त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

या यशाबद्दल ज्येष्ठ पत्रकार दिलीप घरटे, माजी उपसरपंच देविदास जिरे, नारायण जिरे, पत्रकार संजय महाजन, उद्धव जिरे, साहेबराव सोनवणे, पुष्पराज नहिरे, डी. के. इंगळे, अशोक घरटे, निखिल घरटे, विकी साळवे, सिद्धू सोनवणे, भाऊसाहेब पुराणिक, विशाल रायते, समर्थ जिरे, साई विशाल रायते, गजानन इंगळे, अक्षय महाजन, ग्रीन फाउंडेशन उपाध्यक्ष तुषार महाजन तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, बंधू-भगिनी, मित्रपरिवार आणि नातेवाईक यांनी चि. सर्वेशचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याच्या उज्ज्वल शैक्षणिक व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
close