shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

DTSE परीक्षेत यश – एल.जी. बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थिनीची इस्रो भेटीसाठी निवड

DTSE परीक्षेत यश – एल.जी. बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थिनीची इस्रो भेटीसाठी निवड
पळसदेव (प्रतिनिधी):
डीटीएसई (DTSE) परीक्षेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या इस्रो (ISRO) शैक्षणिक भेटीसाठी गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पळसदेव येथील विद्यार्थिनी कु. भैरवी प्रीतम लावंड हिची निवड झाली आहे.
या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून विद्यार्थिनीच्या मेहनतीचे, पालकांच्या प्रोत्साहनाचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे फलित असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत नाना बनसुडे, उपाध्यक्ष डाॅ. शितल कुमार शहा कार्याध्यक्षा सौ.नंदाताई बनसुडे, सचिव सुरज बनसुडे सर प्राचार्य संजय इंगोले, मुख्याध्यापिका सीमा बाराते, उपमुख्याध्यापिका सुवर्णा वाघमोडे,  तसेच सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कु. भैरवी प्रीतम लावंड हिचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करावी आणि अशा स्पर्धा परीक्षांमध्ये अधिकाधिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी शाळेच्या वतीने करण्यात आले.
close