shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये MHT-CET व शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा*

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये MHT-CET व शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा*
इंदापूर: जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 03/07/2026 रोजी MHT-CET व शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 
साजरा करण्यात आला. 
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेतील 151 विद्यार्थी महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवून पास झाले, त्यापैकी 35 विद्यार्थी महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी म्हणुन पात्र झाले आहेत. 
तसेच MHT-CET परीक्षेत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान संस्थेतील विद्यार्थिनीनी मिळवला तसेच 31 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळविले म्हणुन या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पुजनाने  करण्यात आली. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार यांनी केले. 
संस्थेत मिळणार्‍या भौतिक सुविधा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, 
अनुभवी शिक्षक, विद्यार्थी तयारी, याबाबत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थेत मिळणार्‍या विविध भौतिक सुखसोयी, शिक्षकांचे मार्गदर्शन, मुख्याध्यापकांचे वैयक्तिक लक्ष्य, सतत सराव परीक्षा, यामुळे मुलांनी हे यश संपादन केले असे मत पालकांनी  व्यक्त केले. 
MHT-CET परीक्षेत हीबा पल्लीपरमबील  हिने 99.80 % गुण मिळवून तालुक्यात प्रथम तसेच Biology या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला  म्हणुन तिचा फेटा, शाल, ट्रॉफी व रोख 10000 रूपये देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. 
तसेच MHT-CET परीक्षेत 95% पेक्षा जास्त गुण  मिळवणार्‍या विद्यार्थ्यांनाही फेटा, शाल, ट्रॉफी व रोख 10000 रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
संस्थेच्या उपाध्यक्ष तथा लाखेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच ,डॉ चित्रलेखा  ढोले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कुटुंबात ज्याप्रमाणे मुलांची काळजी घेतली जाते त्याप्रमाणे मुलांची काळजी या संस्थेत घेतली  जाते, विद्यार्थी  शिक्षक, पालक या त्रिकोणावरती शाळा चालत असते, यशाने हुरळून जाऊ नका, अपयशाने खेचू नका, आत्मविश्वास वाढावा पण अति आत्मविश्वास नको, मोबाईलचा वापर जरूर करा पण अति नको असे सांगितले, तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे तोंडभरून कौतुक केले.
संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष,पुणे जिल्हा परिषद सदस्य, गटनेते श्रीमंत ढोले यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संस्थेच्या यशाचा आलेख वाढत आहे, तालुक्यात दरवर्षी प्रथम येणारे विद्यार्थी हे आपल्याच संस्थेतील आहेत, 
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय आणि त्यासाठी लागणार्‍या शैक्षणिक सुखसुविधा उपलब्ध करण्यात संस्था कटिबद्ध आहे, संस्थेतील जास्त विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात दिसत आहेत. आजचा प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी भविष्यात चांगल्या पदावर, सुपर क्लास 1 पदावर जाऊन त्यांनी आपले,आपल्या आईवडिलांचे,संस्थेचे, गावाचे नाव उज्ज्वल करावे,जागतिक पातळीवर शिक्षण घ्यावे असा आशावाद व्यक्त केला. 
संस्थेच्या भरभराटीसाठी व उत्तुंग यशासाठी आयुक्त दिलीप ढोले व अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले याची प्रेरणा व मार्गदर्शन लाभते.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक, 
अध्यक्ष,पुणे जिल्हा परिषद सदस्य,गटनेते श्रीमंत ढोले ,उपाध्यक्ष तथा लाखेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच चित्रलेखा ढोले,सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार प्रदिप गुरव, विश्वस्त पृथ्वीराज ढोले, ऋषिकेश ढोले 
विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार,प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सम्राट खेडकर,मार्गदर्शक शिक्षक, यशस्वी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close