shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषी दिनानिमित्त ५००१ वृक्षरोप वाटप व वृक्षारोपण सोहळा..*एक पाऊल पर्यावरणासाठी,एक झाड उद्याच्या पिढीसाठी..*


     *कृषी दिनानिमित्त ५००१ वृक्षरोप वाटप व वृक्षारोपण सोहळा..*

एक पाऊल पर्यावरणासाठी,एक झाड उद्याच्या पिढीसाठी..* 
  इंदापूर: शुक्रवार दि:३/७/२०२६ रोजी श्री शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय बावडा येथे कृषी दिनानिमित्त ॲग्रीकॉस  ग्रुप आयोजित ५००१ वृक्षारोपाचे मोफत वाटप व वृक्षारोपण सोहळा आयोजित करण्यात आला.*
      *कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्षवर्धन पाटील  मा. सहकार व संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य. अध्यक्ष राष्ट्रीय साखर महासंघ. अध्यक्ष श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा हे होते.*
      *कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.* *यावेळी ॲग्रीकॉस  ग्रुपच्या वतीने  हर्षवर्धन पाटील  यांचा सन्मान करण्यात आला.* 
    *यावेळी महाराष्ट्र राज्य उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त अमर भोसले यांचा सन्मान करण्यात आला.* 

     *पर्यावरणाचे रक्षण आणि संतुलन टिकवण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे.प्रत्येक विद्यार्थ्याने झाड लावून त्याचा सेल्फी फोटो काढावा.तसेच अग्रीक्रॉस ग्रुपचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे प्रतिपादन हर्षवर्धन पाटील  यांनी केले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन आवश्यक आहे असेही मत व्यक्त केले* 
    *पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ॲग्रीकॉस  संस्थेच्या वतीने 5001 वृक्षारोपांची मोफत वाटप करण्यात आले.* यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उद्योग भूषण पुरस्कार प्राप्त  अमर अशोक भोसले व त्यांच्या  पत्नी सौ  हर्षदा अमर भोसले यांचा पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाचे उत्कृष्ट कार्य केलेले आहे अशा विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

    *यावेळी  उदयसिंह पाटील सचिव श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी हे उपस्थित होते.* 
 *श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष  मनोज पाटील* 
   *तसेच श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव  किरण  पाटील हे उपस्थित होते.* 
  अनिल  पाटील,  सुधीर पाटील, श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संचालक  स्वप्निल घोगरे,  पवनराजे घोगरे,  संजय घोगरे, रणजीत  गिरमे, उपसरपंच  रणजीत घोगरे,  महादेव शिंदे, तसेच ॲग्री क्रॉस ग्रुपचे सदस्य  किशोर चव्हाण,  महेश कोळेकर,  रोहित खताळ, रोहित मिसाळ, श्री विनोद देवकर,  विशाल रुपनवर,  शिंगारे साहेब,  आशिष बोडके ,  विश्वजीत मगर ,  किशोर घोगरे,  जितेंद्र साळुंखे,  सुरज शेटे,  ताहीर मुलाणी हे उपस्थित होते.
  तसेच प्राचार्य  दशरथ घोगरे सर, उपप्राचार्य शरद व्यवहारे सर, पर्यवेक्षक  रखमाजी लोहकरे सर,  गणेश घोरपडे सर,  चंद्रकांत कोकाटे सर,  भीमराव आवारे सर, लहू वावरे सर, विराज मोहिते सर,  विनायक गुरव सर व सर्व अध्यापक अध्यापिका सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 
     यावेळी ॲग्रीक्रॉस ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांना कृषी दिनविशेष कृतज्ञता 'कृषी मित्र ' प्रमाणपत्र देण्यात आले.
    पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत संस्थेच्या वतीने ५००१ वृक्षारोपांचे मोफत वाटप करण्यात आले.या उपक्रमाला विद्यार्थी शिक्षक तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मुलाणी एस टी सर यांनी केले. तर संचालक  पवनराजे घोगरे यांनी आभार मानले. 

close