shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निरा भीमा कारखान्याकडून तुकाराम महाराज पालखी रथासाठी रु. 5 लाखाचा निधी सुपूर्त

निरा भीमा कारखान्याकडून तुकाराम महाराज पालखी रथासाठी रु. 5 लाखाचा निधी सुपूर्त 
इंदापूर : प्रतिनिधी दि.4/7/26
                                       जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 341 व्या आषाढी पायी वारीसाठी नवा हायटेक पालखी रथ तयार करणेसाठी निरा भिमा सहकारी साखर कारखान्यांकडून रु. 5 लाखाचा निधी देण्यात आलेला आहे. कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी सदर निधीचा धनादेश देहू संस्थांनचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे महाराज व विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिह मोरे महाराज यांचेकडे पुणे येथे शनिवारी (दि. 4) सुपूर्त  केला.
      संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी गेली अनेक वर्षांपासून वापरात असलेला रथ बदलून चालु पालखी सोहळ्यापासून आकर्षक रथ देहू संस्थानकडून तयार केला जात आहे. यापूर्वीच्या रथ निर्मितीसाठीही मी सहकार मंत्री असताना सहकार्य करण्याचे भाग्य आपणास लाभले होते, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
     माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घराण्याला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे. देहु संस्थांच्या विश्वस्तांशी हर्षवर्धन पाटील यांच्या घराण्याचे पिढ्यानपिढ्या ऋणांनुबंध राहिले आहेत. यावर्षी पालखी सोहळ्याचे देहूहून प्रस्थान दि. 7 जुलै रोजी होणार आहे. तर बावडा येथे पालखी सोहळा आल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे निवासस्थानी विश्वस्तांचा परंपरेनुसार सन्मान करण्यात येत आहे.
 दरम्यान, पालखी सोहळ्याचा नवीन रथ हा राजस्थानातील कारागिरांकडून सागवान लाकडामध्ये तयार करण्यात आला आहे. जुन्या रथाच्या तुलनेत नवीन रथ हा सुमारे 500 किलोने वजनास हलका असल्याने ओढण्यास सुलभ झाला आहे. 
______________________________
फोटो:-तुकाराम महाराज पालखीच्या रथासाठी निरा भिमा कारखान्याचे धनादेश पत्र सुपूर्त करताना संस्थापक हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा भाग्यश्री पाटील.
close