shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषदेतील विकास निधी आपल्या भागात आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न - सभापती अंकिता पाटील -ठाकरे.1500 कोटी रुपयांचा विकास आराखडा यावर्षीचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारला सादर - गट नेते श्रीमंत ढोले.पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा भूमिपूजन व सोलार हाय मास्टचे उद्घाटन संपन्न.

जिल्हा परिषदेतील विकास निधी आपल्या भागात आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न - सभापती अंकिता पाटील -ठाकरे.

1500 कोटी रुपयांचा विकास आराखडा यावर्षीचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारला सादर - गट नेते श्रीमंत ढोले.

पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा भूमिपूजन  व  सोलार हाय मास्टचे उद्घाटन संपन्न.
इंदापूर : सर्व सोयीसुविधायुक्त पशुवैद्यकीय दवाखाना आपल्या बावड्यात असणे गरजेचे होते.त्याचे भूमिपूजन सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. आधुनिक एक्स-रे मशीन, सोनोग्राफी मशीन, अधिकारी- कर्मचारी निवासी इत्यादी सोयी- सुविधायुक्त अशी वास्तू या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. बावडा आणि 12 गावातील पशुपालक यांना दवाखान्याचा उपयोग होईल.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील विकास निधी आपल्या भागात आणण्याची जास्तीत जास्त प्रयत्न करीत असल्याची ग्वाही पुणे जिल्हा परिषद पुणेच्या महिला बालकल्याण समितीचे सभापती अंकिता पाटील -ठाकरे यांनी बावडा येथील पुणे जिल्हा परिषद अंतर्गत पशुसंवर्धन विभागांतर्गत बांधण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या भूमिपूजन समारंभ व दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत बावडा परिसरात व दलित वस्ती मध्ये उभारलेल्या सोलार हाय मास्ट च्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना दिली.

यावेळी पुणे जिल्हा परिषद पुणेचे गट नेते श्रीमंत ढोले, निरा भिमा कारखान्याची संचालक तथा श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे सचिव उदयसिंह पाटील, बावडा पंचायत समितीचे सदस्य धनश्री पाटील,लोमेवाडी पंचायत समितीचे सदस्य शिवाजी मोहिते पाटील, बावडा ग्रामपंचायतचे सरपंच पल्लवी गिरमे, उपसरपंच रणजित घोगरे,ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटीचे चेअरमन व संचालक गावातील प्रतिष्ठित मान्यवर, संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

 यावेळी या समारंभाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत बावडाचे सरपंच पल्लवी गिरमे यांनी केले तर यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त शिंदे, पुणे जिल्हा परिषदेचे गट नेते श्रीमंत ढोले, उदयसिंह पाटील यांनी यांनी आपली मनोगत व्यक्त केली. तर आभार उपसरपंच यांनी मानले.
----------------------------------
1500 कोटी रुपयांचा विकास आराखडा यावर्षीचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारला सादर - गट नेते श्रीमंत ढोले 

 गावा - गावातील काँक्रीटचे रस्ते, दलित वस्ती सुधार योजना, बंदिस्त गटार, पाणीपुरवठा या योजना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहू. तसेच या भागाच्या विकासासाठी स्वर्गीय शंकराव पाटील भाऊ यांचे मार्गदर्शन, त्यांनी या भागाला घालून दिलेला वसा पुढे नेण्याचे काम आपण सर्वजण करूया. जिल्हा परिषदेच्या आराखडा तयार झालेला आहे. शासनाने त्याला मान्यता दिली आहे.15 वा वित्त आयोगाच्या निधी प्राप्त झालेला आहे.जवळजवळ 1500 कोटी रुपयांचा विकास आराखडा यावर्षीचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारला सादर केलेला आहे. सर्व योजना तळागाळातील लोकांचा विचार ठेवून या योजना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांसाठी मोटार, ताडपत्री, पंप, कडबाकुट्टी, मॅट, शिलाई, मशीन, पीठ गिरणी अशा असंख्य योजना जिल्हा परिषदेने राबवण्याचे विचार केलेला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सक्त ताकीत दिलेली आहे. निवडणूक संपलेली असून राजकारणापेक्षा समाजकारण करून सामान्य माणसाचे प्रश्न सोडवायचे आहेत व त्या राबवायच्या आहेत. ते सोडवण्यासाठी हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे हे कटिबद्ध असून लोकांना जो विश्वास दिला आहे त्या विश्वासाला तडा जाता कामा नये. हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे यांचे हात बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहूया व लोकांच्या विश्वासाला सार्थ ठरवूया असे अशा शब्दात पुणे जिल्हा परिषदेचे गट नेते श्रीमंत ढोले यांनी विकास कामाबद्दल जनतेला विश्वास दिला.
close