आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर यांची रॅलीस लाभणार प्रमुख उपस्थितीती
वरुड / प्रतिनिधी :
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संत्रानगरी वरूड येथे भव्य तिरंगा रॅलीचू गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता आयोजन करण्यात आले आहे.
ही रॅली शहरातील महात्मा फुले चौक येथून सुरू होणार आहे.
या भव्य तिरंगा रॅलीला आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. सुमित पवार, वरूड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष ईश्वर सलामे, शेंदूरजना घाटच्या नगराध्यक्षा सुवर्णा वरखडे, तसेच नगरसेवक-नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
रॅलीमध्ये विद्यार्थी, माजी सैनिक, महिला मंडळे, सामाजिक संस्था, व्यापारी बांधव, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ. सुमित पवार यांनी केले आहे.
देशभक्तीचा उत्साह, हातात तिरंगा आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषात ही रॅली भव्य स्वरूपात काढण्यात येणार असून, सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार प्रविण सावरकर - वरुड
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

