हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र आक्रोश मोर्चा;
तहसील कचेरीवर काढली प्रेतयात्रा!
“आमच्या माऊलीबद्दल आणि महिलांना तुच्छ लेखणाऱ्या - बेताल वक्तव्य करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ!” – श्रीमंत ढोले सर, गटनेता, पुणे जिल्हा परिषद, पुणे
इंदापूर: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माऊली आदरणीय श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्याबद्दल काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याच्या विरोधात इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करत, तहसील कचेरीवर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रेतयात्रा काढून कडक शब्दांत जाहीर निषेध नोंदवण्यात आला.
या तीव्र आक्रोश मोर्चाचे नेतृत्व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर आणि इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी केले.
या आंदोलनात पंचायत समितीचे सभापती . हर्षवर्धन लोंढे, पंचायत समितीचे गटनेते बापूराव शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रमुख मागण्या व इशारा:
जाहीर माफीची मागणी: काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील महिलांचा आणि सुनेत्रा पवार यांचा केलेला अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यांनी त्वरित आपली चूक मान्य करून बिनशर्त सुनेत्रा पवार यांची
जाहीर माफी मागावी.
तीव्र आंदोलनाचा इशारा:
महिलांचा सन्मान ही राष्ट्रवादी काँग्रेसची संस्कृती आहे. सपकाळ यांनी वेळेत माफी न मागितल्यास राज्यभरात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.
आंदोलनादरम्यान इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे आणि पोलीस निरीक्षक विलास नाळे यांना निवेदन देऊन हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

