परतीच्या प्रवासादरम्यान संत तुकाराम महाराज यांची पालखी वडापुरी येथे विसावली.
इंदापूर- वडापुरी :
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या प्रवासादरम्यान तिसऱ्या दिवसाच्या मुक्काम ठिकाणी वडापुरी तालुका इंदापूर येथील थोरातवस्ती येथे ज्ञानोबा तुकोबाच्या नाम गजरात विसावला.
आषाढी एकादशी वारी पूर्ण करून जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपुराहून परतीचा प्रवास करत असताना आज सकाळी सहा वाजता महाळुंग ता- माळशिरस जिल्हा- सोलापूर येथून सकाळी सहा वाजता वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या दिशेने तिसऱ्या दिवशी परतीच्या मुक्कामाला निघाली असता ठिकठिकाणी जोरदार स्वागत करून भाविक भक्तांनी पालखीचे दर्शन घेतले.
सायंकाळी ५: ४५वाजता परतीच्या प्रवासातील वडापुरी येथे पालखी दाखल होताच गावातील भजनी मंडळ ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. प्रथम संत तुकाराम महाराज मंदिर वडापुरी येथे पालखी थांबून आरती संपन्न झाली. त्यानंतर नेहमीप्रमाणे वडापुरी येथील थोरातवस्ती येथे पालखी सोहळा विसावला. यावेळी सर्व विणेकरी वारकरी यांच्या उपस्थितीमध्ये थोरात कुटुंबीयांच्या वतीने सतुभाऊ थोरात यांना आरतीचा मान देण्यात आला व आरती संपन्न झाली .यानंतर विनेकरांची हजेरीचा कार्यक्रम व उपस्थित विश्वस्तांचा मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला .त्यानंतर थोरात कुटुंबीयांच्या वतीने महाप्रसाद संपन्न झाला.
रात्री ह भ प बापूसाहेब महाराज मोरे यांचे कीर्तन तर हरिजागर वडापुरी भजनी मंडळ यांच्या वतीने सादर झाला.
यावेळी माजी अध्यक्ष बापूसाहेब मोरे,विश्वस्त दिलीप मोरे, पालखी सोहळा प्रमुख उमेश मोरे, माजी विश्वस्त माणिक मोरे, मुख्य विणेकरी रामदास मोरे, माजी विश्वस्त भानुदास मोरे, चोपदार काका गिराम इत्यादी मान्यवर व वारकरी उपस्थित होते.
यावर्षी मुक्काम स्थळी प्रशस्त असे पत्रा टाकलेला सभामंडप यामुळे वारकऱ्यांची व्यवस्था झाली तसेच श्रीनाथ मंदिर परिसरात भव्य असा जर्मन तंबू टाकल्याने वारकऱ्यांच्या विसाव्याची उत्तम व्यवस्था दिसून आले.
-----------------------
फोटो ओळ: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या प्रवासात वडापुरी येथील थोरातवस्ती येथे विसावला.

