shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंबाजी लिंबाजी देवस्थान येथे गुरुपौर्णिमेला मानाचा झेंडा व पालखी मिरवणूक उत्सव उत्साहात साजरा.

अंबाजी लिंबाजी देवस्थान येथे गुरुपौर्णिमेला मानाचा झेंडा व पालखी मिरवणूक उत्सव उत्साहात साजरा.
इंदापूर - वडापुरी: इंदापूर तालुक्यातील श्री मच्छिंद्रनाथ व श्री गोरक्षनाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वडापुरी मध्ये( दि. 29 जुलै 2026)  श्री अंबाजी लिंबाजी देवस्थान येथे गुरुपौर्णिमा निमित्त नंदीवाली समाजाच्या वतीने मानाचा झेंडा व पालखी मिरवणूक उत्सव उत्साहात संपन्न झाला. 
वडापुरी येथे दिनांक २५ जुलै पासून एक महिन्यासाठी तीन वर्षातून नंदीवाले समाज एकत्र येत मोठ्या भक्ती भावाने आपल्या कुलदैवत श्री अंबाजी लिंबाजी देवस्थान व श्री राममामा यांच्या परिसरामध्ये राहुट्या बांधून आपला कुलधर्म कुलाचार करीत असतात. तर गुरु पौर्णिमेला मानाचा झेंडा व पालखी मिरवणूक उत्सव काढून गुलालाची उधळण करत, ढोल ताशाचा गजर, फटाक्यांची आताशीबाजी आणि महिलांच्या डोक्यावरती कलश घेऊन भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली . 
यावेळी नवस म्हणून काही लोकांनी देशी गाय यांना सजवून, येतोच पूजा करून त्यांची ही मिरवणूक काढली. तर काहीजणांनी महाप्रसाद वाटप केला. अतिशय भक्तिभावामध्ये मानाचा झेंडा व पालखी मिरवणूक उत्सव साजरा करण्यात आला. 
याप्रसंगी राज्याची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, भाजप नेते प्रवीण माने, कर्मयोगी कारखान्याची संचालक राजवर्धन पाटील, माळवाडी वडापुरी जिल्हा परिषदेचे सदस्य यशराज जगदाळे तसेच इतर अनेक मान्यवर यांनी उपस्थिती दर्शवली. 
 हा उत्सव साजरा करण्यासाठी
अंबाजी लिंबाजी देवस्थान ट्रस्टचे 
 अध्यक्ष  दशरथ पवार ,देवस्थान यात्रा कमिटीचे रामा वाघमोडे, लक्ष्मण वाघमोडे, अंबादास शेंडगे,रामभाऊ वाघमोडे, रामचंद्र वाघमोडे ,राजाराम पवार, मारुती वाघमोडे,यल्लाप्पा वाघमोडे,अनिल वाघमारे ,तायाप्पा पवार ,मोतीराम पवार ,सोपान पवार, मोतीराम वाघमोडे ,रामा शिंदे, वसंत पवार, 
शांताराम पवार, प्रताप पवार इत्यादींनी परिश्रम घेतले.
--------------------------
फोटो ओळ: वडापुरी (ता - इंदापूर) येथे गुरुपौर्णिमा निमित्त श्री अंबाजी लिंबाजी देवस्थान येथे मानाचा झेंडा व पालखी मिरवणूक उत्साहात साजरी करण्यात आली.
close