शौकतभाई शेख / श्रीरामपूर
श्रीरामपूर पोलीस विभाग व डी डी काचोळे माध्यमिक विद्यालय, श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान रॅली श्रीरामपूर शहरातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली. अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली अभियानाचे उद्घाटन डी डी काचोळे विद्यालयाच्या प्रांगणात सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे आणि रामचंद्र शिखरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे, पर्यवेक्षक सूर्यकांत सराटे हे उपस्थित होते.
श्रीरामपूर पोलीस विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचनेनुसार उपअधीक्षक देवदत्त भवर तसेच पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली आयोजित करण्यात आली. नशा मुक्त श्रीरामपूर होण्यासाठी पोलीस विभाग व काचोळे विद्यालय यांनी हा अनोखा उपक्रम हाती घेतला.
याप्रसंगी एपीआय लोखंडे म्हणाले की अमली पदार्थ तसेच इतर नशेचे पदार्थ याच्यापासून तरुणाईने लांब राहावे व आपले सुखी जीवन आनंदाने जगावे, निरोगी जीवन जगावे यासाठी लहान मुलांनी केलेल्या ड्रग्ज फ्री श्रीरामपूर या अभियानाला आपण सर्वांनी साथ देऊया.
विद्यालयातील बाराशे विद्यार्थ्यांनी या नशा मुक्त जनजागृती अभियान रॅलीमध्ये सहभाग नोंदवला व श्रीरामपूरवासी यांना धूम्रपान व नशा टाळून निरोगी जीवन जगण्याचा संदेश दिला. ही रॅली काचोळे विद्यालयातुन पुढे अक्षय कॉर्नर - शिवाजी रोड- नेवासा संगमनेर रोड - मार्गे जनजागृती करत विद्यालयात आली. अमली पदार्थ विरोधी रॅली आयोजित करण्यासाठी पोलीस विभागाचे गोपनीय शाखेचे प्रमुख कदम तसेच पीएसआय चव्हाण विद्यालयातील वसतीगृहाचे अधीक्षक महेंद्र भराड, उपशिक्षक नानासाहेब मुठे, भाऊराव मुठे, संदीप कदम, वैजयंती सोनवणे, रवींद्र निकम यांचेही मुलाचे सहकार्य लाभले.
रॅलीमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग यांचाही सहभाग होता.
अमली पदार्थ विरोधी अभियानास श्रीरामपूर मध्ये अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पालक व नागरिक यांनी कौतुक केले.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

