प्रत्येक कुटुंबातील एक बालिका सुशिक्षित झाली तर अख्या कुटुंबाबरोबर राष्ट्राचा विकास होतो- डॉ. जयश्री फडणवीस
जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूर येथे जागतिक आदिवासी दिन तथा आदिवासी गौरव दिन साजरा.
वारीत वारकर्यांच्या चरण सेवा केलेल्या विद्यार्थ्यांना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे देण्यात आले सन्मानपत्र .
इंदापूर: प्रत्येक कुटुंबातील एक बालिका सुशिक्षित झाली तर अख्या कुटुंबाबरोबर राष्ट्राचा विकास होतो असे प्रतिपादन डॉक्टर जयश्री फडणवीस यांनी ऋषी बहुउद्देशीय व शैक्षणिक विकास संस्था संचलित जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूर येथे जागतिक आदिवासी दिन तथा आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी केले.
तसेच फडणवीस पुढे म्हणाल्या की,मुलींनी काही गोष्टी आयुष्यभरा करिता शिकल्या पाहिजेत ,सांभाळल्या पाहिजेत, ज्यातून आपले आयुष्य समृद्ध होऊ शकतं. जसे आपल्याला हक्क कळतात तसे आपल्या मर्यादाही कळलं पाहिजेत. मर्यादा आणि ध्येय याचा विचार मुलींना कधीच पडला नाही पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आत्मपरीक्षण सातत्याने केलं पाहिजे. स्वतःला अबला नाही सबला बनवा. ठामपणे नम्र बोलणे हा गुण प्रत्येक महिलेने आपल्यामध्ये विकसित केला पाहिजे. स्वतःची सुरक्षा स्वतःच केली पाहिजे. त्यासाठी मला कोणावरही अवलंबून राहता कामा नये. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक या दोन गोष्टींचा फिटनेस आपल्याला सांभाळता आला पाहिजे. नियमित व्यायाम उत्तम आहार आणि उत्तम वाणी आहार, विहार ,आचार, विचार या चार गोष्टींची सुसूत्रता मला कायम पाळायला हवी.
मानवी नातेसंबंध मध्ये नमस्कार सारख्या परंपरावाधी पद्धती आहेत त्यामध्ये शास्त्रशुद्ध विचार आहेत. ते समजून घ्यावे. कोणावरही पटकन विश्वास ठेवण्यापेक्षा किंवा कुठली अफवा पसरवण्यापूर्वी त्याच्यावर नीट विचार करा .माझी वैचारिक पद्धत शास्त्र, तत्व आणि बुद्धीप्रमाणे व्हावी .सायन्स, लॉजिक अँड नॅशनॅलिझम या तीन गोष्टी वरती अवलंबून असले पाहिजे.
प्रत्येक क्षेत्रामध्ये मला माझे ध्येय गाठले पाहिजे. ध्येय हे पाच गोष्टींमध्ये आहे. ते म्हणजे
मी माझी, माझ्यात काय काय कमी आहे, माझे कुटुंब, माझे प्रोफेशन यात नवनवीन माहिती जाणून घेतली पाहिजे. सामाजिक कार्य, निसर्गाची जपणूक करणे .
मुलींनो आपली ध्येय उद्दिष्ट नीट समजून घ्या. यावरती काम करा, स्वतःला सबला बनवत सुरक्षित ठेवत कॉलेज जीवनासह पुढील आयुष्य दर्जेदार जागा. अशा पद्धतीने डॉक्टर जयश्री फडणवीस यांनी जय इन्स्टिट्यूट नर्सिंग चे संस्थापक अध्यक्ष जयंत नायकुडे व लता नायकुडेआणि उर्मिला नायकुडे यांचे आदिवासी भागातील मुलींना अतिशय दर्जेदार शिक्षणासह संस्कार देण्याची व्यासपीठ तयार केले त्याबद्दल कौतुक केले.
ऋषी बहुउद्देशीय व शैक्षणिक विकास संस्था संचलित जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूर येथे जागतिक आदिवासी दिन तथा आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉक्टर जयश्रीताई फडणवीस उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शन प्रदीप गारटकर, कृष्णा ताटे,सहाय्यक प्रकल्प अधिकारी मावसकर,समाजसेवक योगपाल लबडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सोलापूर जिल्हा समन्वयक डॉ अविनाश खांडेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आदिवासी दिनानिमित्त आदिवासी गीत नृत्य विद्यार्थिनींनी सादर केले तसेच नुकतीच संपन्न झालेल्या वारी मध्ये वारकर्यांच्या चरण सेवा केलेल्या विद्यार्थ्यांना मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे सन्मान पत्र देण्यात आले.

