shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईसच्चरित पारायण सोहळ्याला भक्तिभावाने प्रारंभ; २०१९ पासून तुषार महाजन यांचा साईभक्तीचा प्रवास; यंदा पारायणाचे आठवे वर्ष

‘श्रद्धा आणि सबुरी’च्या मार्गावर आठवे पाऊल; तुषार महाजन यांचा साईसच्चरित पारायणाचा भक्तिमय प्रवास

नगर प्रतिनिधी : 
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी आणि नाट्यरसिक संच व शिर्डी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आयोजित श्री साईसच्चरित पारायण सोहळा २०२६ याचा भक्तिमय व मंगलमय वातावरणात उत्साहात शुभारंभ झाला. यंदाच्या सोहळ्याचे हे ३२वे वर्ष असून, साईभक्त मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने पारायणात सहभागी होत आहेत.

साईबाबांच्या चरणी श्रद्धा ठेवून साईसच्चरिताचे वाचन व चिंतन केल्याने मनाला शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. साईबाबांनी दिलेली ‘श्रद्धा आणि सबुरी’ ही शिकवण आजच्या धावपळीच्या जीवनातही प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरत आहे. साईसच्चरितातील विचार आचरणात आणल्यास जीवनाला योग्य दिशा मिळण्यासोबतच सेवाभाव, माणुसकी आणि सद्विचारांची प्रेरणा मिळते.

ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तुषार महाजन यांचा २०१९ मध्ये प्रथम साईसच्चरित पारायणाला बसण्याचा योग आला. त्यानंतर दरवर्षी साईबाबांच्या कृपेने पारायणात सहभागी होण्याची संधी मिळत गेली. २०१९ ते २०२६ या भक्तिमय प्रवासात यंदा पारायणाचे आठवे वर्ष पूर्ण होत असल्याने हा क्षण विशेष आनंददायी आणि भावनिक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

गेली आठ वर्षे साईसच्चरिताच्या माध्यमातून साईबाबांचे विचार, त्यांची शिकवण आणि भक्तीचा अनुभव घेताना जीवनात साईसेवेची आणि साईभक्तीची ओढ अधिक दृढ झाली. पारायणाच्या माध्यमातून मिळणारे मानसिक समाधान, सकारात्मक विचार आणि सेवाभावाची प्रेरणा ही शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगात तरुण पिढीनेही साईसच्चरिताचे वाचन व पारायण करावे, असे आवाहन करण्यात आले. साईबाबांचे विचार तरुणांना संयम, सकारात्मकता, श्रद्धा, सबुरी आणि माणुसकीचा मार्ग दाखवू शकतात. सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी साईसच्चरितातील शिकवण आत्मसात करणे अत्यंत उपयुक्त ठरते.
पारायण सोहळ्याच्या प्रारंभी भक्तांनी साईनामाचा जयघोष करत भक्तिभावाने सहभाग नोंदविला. संपूर्ण परिसरात ‘ॐ साई राम’ च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
साईचरणी श्रद्धा, मनात सबुरी आणि हातून सेवा—या त्रिसूत्रीने साईभक्तीचा हा प्रवास यापुढेही अखंड सुरू राहावा, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
close