shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुकडी डावा कालवा दुरुस्ती कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न


शिर्डी एक्सप्रेस | प्रतिनिधी
जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत कुकडी पाटबंधारे प्रकल्पातील महत्त्वाच्या दुरुस्ती कामांचा भूमिपूजन समारंभ जवळा ता.पारनेर, जिल्हा अहिल्यानगर याठिकाणी रविवार दि.०९/०८/२०२६ रोजी उत्साहात पार पडला. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत कुकडी डावा कालवा कि.मी. ० ते ५९ मधील उर्वरित दुरुस्ती कामे हाती घेण्यात आले असून या कामाची अंदाजित किंमत रु. १६७.६६ कोटी इतकी आहे.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे भूमिपूजन मा. ना. डॉ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ), महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अहिल्यानगर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमास आमदार मा. श्री. काशिनाथ दाते, विधानसभा सदस्य, पारनेर यांच्यासह कार्यकारी अभियंता ,उप अभियंता विविध मान्यवर, अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुकडी डावा कालवा कि.मी. ० ते ५९ मधील उर्वरित दुरुस्ती कामांमुळे कालव्याची कार्यक्षमता वाढून सिंचन व्यवस्थेला मोठा लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील शेतीला अधिक सक्षम पाणीपुरवठा होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

हा भूमिपूजन समारंभ दि. ०९ जून २०२६ रोजी संपन्न झाला.
close