पोलीस, आरोग्य विभाग व एस.टी. कर्मचाऱ्यांना राखी बांधून व्यक्त केली कृतज्ञता
वरुड (जि.अमरावती) प्रतिनिधी:
रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) व अकॉर्ड फाउंडेशन, वरूड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या रक्षाबंधन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी, एस.टी. महामंडळाचे आगार व्यवस्थापक व कर्मचारी तसेच वरूड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाची सेवा सुरळीत ठेवणारे एस.टी. महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याप्रती यावेळी आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांमध्ये आपुलकी, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
यावेळी सविता काळे, रूपाली पुंड, रंजना भोंडे, मनिषा उईके, रोशनी तडस, पूजा नरहरे,. दीपिका वाघमारे, शीतल धोटे, अनिता चांदणे, जमीर पटेल, धीरज पंडागळे, वसीम शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या हातावर राखी बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार प्रविण सावरकर - वरुड
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

