अकोले-(प्रतिनिधी) -> अकोले तालुका रेल्वे कृती समिती व अकोले तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने नाशिक-पुणे हायस्पीड मूळ संकल्पित मार्गानेच व्हावे याबाबतचे निवेदन अकोल्याचे तहसीलदार श्री. सिद्धार्थ मोरे यांना देण्यात आले.
बुधवारी २ सप्टेंबर रोजी नाशिक, पुणे, अहिल्यानगर ह्या तीन जिल्ह्याची रेल्वे कृती समितीची बैठक राजगुरुनगर येथे संपन्न झाली. त्यानुसार प्रामुख्याने ह्या रेल्वेमार्गाबाबत मंजूर असूनही नारायणगाव येथील खोडदच्या जागतिक जी.एम.आर.टी.च्या कारणाने बंद असल्याचे सांगितले जाते. मात्र वेळोवेळी आंदोलने, रस्ता रोको झाले. मात्र राज्यशानाने त्यावर पर्याय म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री. अनिल काकोडकर समिती स्थापन केली. व शासनाने ६० दिवसात अहवाल आल्यानंतर निर्णय देऊ सांगितले. मात्र ३५ दिवस पुर्ण होऊनही अद्याप जनसुनावणी झाली नाही.तसेच
सात तालुक्यात प्रत्येक गावात जाऊन लोकांची मते जाणून घेण्याचे सांगितले होते. मात्र ३५ दिवस होऊनही काकोडकर समितीचे सदस्य अद्यापही फिरकले नसल्याने रेल्वे कृती समिती याबाबत आक्रमक झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक-पुणे महामार्गावरील सातही तालुक्यातील प्रत्येक तहसीलला निवेदन देण्याचे ठरले. त्यानुसार सर्व अकोले तालुका रेल्वे कृती समिती व ग्राहक पंचायतीने तहसीलदारांना अकोले येथे निवेदन दिले श्री.सिध्दार्थ मोरे यांनी वरिष्ठांना निवेदन पाठवणार असल्याचे
सांगितले तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी नाशिक, पुणे, अहिल्यानगरच्या रेल्वे कृती समितीचे सदस्य, पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे, ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जगदीशशेठ चौधरी, जेष्ठ नेते माधवराव तिटमे, सरपंच प्रदिप हासे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश नवले, कवी ज्ञानेश पुंडे, राम रुद्धे, रामदास पांडे, इंजिनियर वसंतशेठ बाळसराफ, अजित हासे, अॅड. राम भांगरे, सेवानिवृत्त प्राचार्य आदिनाथ सुतार सर, नरेंद्र देशमुख, कारभारी बंदावणे, आनंदराव वाकचौरे, आप्पासाहेब आवारी, सौ. सुमनताई जाधव, एन. टी. कदम, पांडुरंग पथवे, बबनराव तिकांडे, ऋषिकेश देशमुख, राहुल शेटे, शेख नाजीम, रविंद्र मालुंजकर,जालिंदर घोडके,दत्ता शेणकर,प्रकाश मालुंजकर,भाऊसाहेब आभाळे,संतोष नवले,अमित यवले यांच्यासह विविध नागरिक होते.सदर निवेदनाच्या प्रति केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैश्नव, मुख्यमंत्री,खासदार भाऊसाहेब वाकचौरे व जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना पाठविण्यात आल्या आहेत.

