वडाळा महादेव [ प्रतिनीधी ] श्रीरामपूर नगरपालिका शाळा क्रमांक ३ च्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी असलेली नाळ जपत सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे. माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत माजी विद्यार्थी संघाच्या वतीने दि. १८ सप्टेंबर रोजी शाळेच्या प्रांगणात बोअरवेल घेण्यात आला. त्यामुळे शाळेचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली असून, शाळेच्या आवारातील परसबागही आता मुबलक पाण्यामुळे अधिक हिरवीगार होणार आहे. स्नेह मेळाव्यात दिलेले आश्वासन अल्पावधीत पूर्ण दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी नगरपालिका शाळा क्रमांक ३ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला.
या मेळाव्यात शाळेच्या विविध गरजांबाबत चर्चा झाली. त्यावेळी शाळेसाठी बोअरवेल घेण्याचे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी दिले होते. अवघ्या काही दिवसांतच या आश्वासनाची प्रत्यक्ष पूर्तता करण्यात आली. शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष विजय शेळके यांच्या प्रयत्नातून माजी विद्यार्थ्यांना एकत्रित केले. माजी विद्यार्थी संघ व सेवानिवृत्त मुख्याध्यापक नवनाथ अकोलकर यांच्या पुढाकारातून शाळेच्या प्रांगणात बोअरवेल घेण्यात आला. बोअरवेलमुळे विद्यार्थ्यांना पिण्यासाठी तसेच शाळेच्या परिसरातील विविध उपयोगांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. विशेषतः शाळेतील परसबागेला नियमित पाणी मिळाल्याने ती अधिक बहरणार असून विद्यार्थ्यांना निसर्ग व पर्यावरणाशी जोडणारे वातावरण निर्माण होणार आहे.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विजय शेळके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नवनाथ अकोलकर, महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब लबडे, भैरवनाथनगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भारत तुपे, अशोक माने, नितीन फरगडे, राजू शिरसाठ, अशोक वाघ, दिलीप गोराने, ताया शिंदे, मारुती शिंदे, महादेव मंदिर देवस्थानचे विश्वस्त शंकर चव्हाण, भैरवनाथ प्रतिष्ठान सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुखदेव देवकर, प्रशांत शिर्के, चंद्रकांत कांदळकर, भागचंद लबडे, वाल्मिक बोर्डे, धर्मराज लबडे, अशोक कांबळे, रंगनाथ जावरे, प्रकाश माने, अमृता अकोलकर, ताराचंद पगारे आदी माजी विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी योगदान दिले.
या योगदानाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता गायकवाड मॅडम, राजेंद्र गायकवाड सर, श्रीमती प्राची लोळगे मॅडम, श्री सचिन डोखे सर, पल्लवी बोरुडे मॅडम यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले
000

