जिल्ह्यातील गायन,संगीत,नृत्य क्षेत्रातील
कलावंतांना मिळाले हक्काचे व्यासपीठ !
अहिल्यानगर / प्रतिनिधी:
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कलाकारांच्या हितासाठी व त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कराओके असोसिएशन ऑफ आर्टिस्ट फॉर म्युझिक या राज्यस्तरीय संस्थेच्या अहिल्यानगर शाखेची नुकतीच स्थापना करण्यात आली.
कराओके असोसिएशन ऑफ आर्टिस्ट फॉर म्युझिक, (काम) ही राज्यस्तरीय संस्था असून यात अध्यक्ष राजकुमार तिखे, वैजू चांडवले, आरती दीक्षित, प्रकाश सावंत इत्यादी सुप्रसिद्ध गायक कलाकार कार्यकारणी सदस्य आहेत. राज्यभरातील कलाकारांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्या अडीअडचणी दूर करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, शासकीय योजनांची त्यांना माहिती देणे, स्पर्धांचे आयोजन करणे इत्यादी उद्दिष्टे या संस्थेची आहेत. अहिल्यानगर शाखेची स्थापना करताना नगर मधील ऋणानुबंध संस्थेचे अध्यक्ष अजित रोकडे यांची संस्थेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. नुकतीच अहिल्यानगर मध्येही या संस्थेची सभा होऊन जिल्ह्यासाठी कार्यकारिणी तयार करण्यात आली.
अहिल्यानगर मधील सुप्रसिद्ध गायक डॉक्टर दमन काशीद यांची आणि प्रशांत बंडगर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर सारिका रघुवंशी यांची कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. आर्किटेक्ट व अनाम प्रेमचे अजित माने यांची सचिव तर सचिन परदेशी यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉक्टर शैलेंद्र खंडागळे व वैदेही बल्लाळ यांची संघटक पदी निवड करण्यात आली. नगर मधील सुप्रसिद्ध गायक अजय दगडे,जुबेर शेख व आबीद खान यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या सभेत बोलताना अध्यक्ष अजित रोकडे म्हणाले की प्रशासनाकडून सर्व कलाकारांना नाट्यगृह व इतर सोयी सुविधा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे तसेच कलाकारांच्या आर्थिक सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात येणाऱ्या अडी अडचणी सोडवण्यासाठी ही संस्था पाठबळ देण्याचा प्रयत्न करणार आहे. कलाकारांना तज्ञांकडून मार्गदर्शन,विविध कार्यक्रमांचे आयोजन, कलाकारांना विमा संरक्षण आणि शासकीय योजनांचा लाभ इत्यादी बाबींसाठी संस्था कार्यरत राहणार आहे.
याप्रसंगी डॉक्टर दमन काशीद, अजित माने, प्रशांत बंडगर,अजय दगडे, डॉक्टर शैलेंद्र खंडागळे, वैदेही बल्लाळ, अबीद खान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील गायक,वादक, नृत्य कलाकारांना संस्थेचे सभासद होण्यासाठी अध्यक्ष अजित रोकडे यांनी आवाहन केले आहे. व सभासद फॉर्म प्राप्त करण्यासाठी मोबाईल क्रमांक 94 20 63 50 96 आणि 94 22 22 0123 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान
अ.नगर - 9860577869
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

