शहीद अशफाकुल्ला खान देशभक्ती आणि एकतेचे प्रतीक - प्रो.नवेद बिजापूरे
अहिल्यानगर / प्रतिनिधी:
अल हादी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने थोर स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक शहीद अशफाकुल्ला खान यांच्या जयंतीनिमित्त मुकुंदनगर येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक नवेद बिजापुरे आणि मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबिद दुलेखान उपस्थित होते.
शहीद अशफाकुल्ला खान यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा, त्यांचे देशप्रेम, त्याग आणि बलिदान यांची आठवण या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आली. ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीविरुद्ध लढताना त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या जीवनातून आजच्या तरुण पिढीला देशभक्ती, धैर्य, त्याग आणि राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा मिळते. शहीद अशफाकुल्ला खान यांचे जीवन हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि सर्वधर्मसमभावाचे प्रेरणादायी प्रतीक आहे. स्वातंत्र्यलढ्यात विविध धर्मांच्या क्रांतिकारकांनी एकत्र येऊन देशासाठी संघर्ष केला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आणि विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजविणे ही काळाची गरज आहे, असा संदेश प्रोफेसर नवेद बिजापुरे यांनी या जयंती कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला.
शहीद अशफाकुल्ला खान यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या देशभक्तीच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास समजण्यास मदत होते आणि समाजात राष्ट्रीय एकात्मता व बंधुभावाची भावना दृढ होण्यास हातभार लागतो.असे आबीद खान यांनी नमूद केले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान
अ.नगर - 9860477869
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

