shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दैनंदिन पर्यावरण

पर्यावरण रक्षण म्हणजे निसर्गाला समजून घेत निसर्गाच्या जवळ जाणे आणि निसर्गनिर्मित सात्विक वस्तूंचा वापर पदोपदी करणे.

एक लक्षात घ्या आपण सकाळी दंतमंजन करतो. हात पाय धुतो, साबण  वापरतो, आंघोळ करतो. या प्रत्येक ठिकाणी आपण तयार वस्तू वापरतो. ती वस्तू टिकवण्यासाठी त्यात विषारी रासायनिक द्रव्ये वापरली जातात. ही रासायनिक द्रव्ये, उदाहरणार्थ टूथपेस्ट दाताला घासली की आपण तो फेस बेसिन मध्ये थूंकतो आणि त्यासाठी वारेमाप पाणी खर्च करतो. या ऐवजी उत्तम पैकी झाडपाल्यापासून बनवलेले दंतमंजन वापरले तर आरोग्याचा जिवंत स्त्रोत हिरड्यांपर्यंत पोहोचेल. हिरड्या मजबूत होतील. दात मजबूत होतील. अगदी दंतमंजन पोटात गेले तरी ते वनस्पतींनीयुक्त असल्याने शरीराला फायदाच होईल. पाणी वाचेल,साबण, दंतमंजन पावडर हे सगळं सकाळी वापरून अतोनात पाणी खर्च करत ते पाणी नदीला गेले की त्यातील केमिकल्समुळे जलसृष्टी नाश पावते. याचे सर्वस्वी जबाबदार आपणच आहोत. मग त्यासाठी आंघोळीकरीता उटणे वापरा. दाताला दंतमंजन, भांडी घासायला नारळाचा चोथा किंवा अनेक सेंद्रिय पर्याय आज बाजारात आहेत ते वापरावे. जीवसृष्टी वाचली तर माणूस वाचेल. नद्या वाचतील. विचार करा आपल्या अवतीभवती असलेल्या निसर्गदत्त साधनांचा वापर करून कमीत कमी गरजांमध्ये जगायला शिका. 



पर्यावरण रक्षण करण्यासाठी गरजा मर्यादित करणे तितकेच गरजेचे आहे. आपल्या सभोवती असलेल्या वस्तूंचा वापर न चुकता केला तर स्थानिक बाजारपेठेमध्ये स्थानिक उत्पादने येतील आणि सभोवतालची अर्थव्यवस्था विकसित होईल. अर्थव्यवस्था विकसित झाल्यावर आर्थिक स्थैर्य, स्वच्छता, जीवसृष्टी समृद्ध होऊन एकमेकाला ओरबडून खाण्याची प्रवृत्ती संपेल. प्रत्येक जण दुसऱ्याच्या हितात आपलं हित आहे असं समजून वागेल तर बंधुभाव वाढेल. विनाकारण होणारा नैसर्गिक संपत्तीचा अपव्यय टळेल आणि नक्कीच 

पर्यावरण मनाचे! पर्यावरण जनाचे! पर्यावरण नभो मंडळाचे! मानवास उपकारी !! अशी स्थिती यायला वेळ लागणार नाही.

वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 


लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे

संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार


कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..

पर्यावरण दिन ५ जूनपासून वन हुतात्मादिन ११सप्टेंबरपर्यंत२०२१  असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

close