shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वटवाघळांमध्ये आढळला "निपाह" विषाणू🦇

वटवाघळांमध्ये आढळला "निपाह" विषाणू🦇


          
✴️ राज्यातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. वटवाघळांमध्ये विषाणू आढळून आल्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी याबाबत माहिती दिली आहे. 

👨🏻‍🦰 माणसांमध्ये आहे संक्रमणाची भीती
मार्च २०२०मध्ये सातऱ्यातील महाबळेश्वरमधील गुहेत हे वटवाघूळ सापडले आहेत. देशात याआधी काही राज्यात निपाह विषाणू आढळला होता पण राज्यात याआधी वटवाघळांमध्ये निपाह विषाणू कधीही आढळला नव्हता. हा विषाणू वटवाघूळांमधून मानवाच्या शरीरात संक्रमित होतो, अशी माहिती याबाबत संशोधन करणाऱ्या डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली आहे.

💉 आद्याप लस उपलब्ध नाही🏥
निपाह विषाणूवर अद्याप लस किंवा औषध उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे हा विषाणू धोकादायक मानला जातो. औषध उपलब्ध नसल्यानेे मृत्यूदर मोठा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वटवाघुळांमुळे
इबोलासारखे गंभीर व्हायरस समोर आले होते.                     
अशी महिती पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी दिलेली आहे.                         
➡️दिपक हरिश्चंद्रे (पत्रकार - खडांबे खु!)  प्रतिनिधि - वांबोरी.
close