वडापूरी येथील हनुमान व्यायाम शाळेला हर्षवर्धन पाटील यांची सदिच्छा भेट.
इंदापूर: दि.२२जून २०२१ रोजी वडापुरी येथील हनुमान व्यायाम शाळा व जिम अँड फिटनेस क्लब या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन हनुमान व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष किरण गोसावी वस्ताद यांच्या व्यायाम शाळेबद्दल विशेष कौतुक करून शब्बासकीचि थाप्पा दिली. तरुणांमध्ये मध्ये शारीरिक दृष्ट्या सदृढ करणारे आणि संस्कार घडवणारी ही व्यायामशाळा वडापुरी पंचक्रोशीतील तरुणांना सक्षम बनवणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की,करोणासारख्या भिषण परीस्थितीत शरीराची रोगप्रतीकार शक्ती वाढवण्यासाठी व्यायामाची खुप गरज आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही मुलांसाठी तसेच सर्व स्तरातील स्त्री पुरुषांसाठी सुंदर असा ऊपक्रम राबवत आहे ,व यामुळे तरूणांचे ही करीअर घडणार आहे, या भाषेत किरण गोसावी यांचे कौतुक केले.
यावेळी किरण गोसावी यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वेळातवेळ काढून जिमला सदिच्छा भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीने उपस्थित तरूणांमध्ये उत्साहपूर्वक वातावरण निर्माण झाले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल कदम, राजू गोसावी,वैभव गोसावी, तुषार गोसावी, रणजीत गोसावी, पांडुरंग शिर्के, हरिदास गवळी,नितीन गोसावी, ओमकार पाटील, ओम गोसावी ,प्रज्वल गोसावी, पांडुरंग देवकर, प्रतीक गोसावी व व्यायाम शाळेतील तरुण उपस्थित होते