shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य..!!

बाबाजीे ढमढेरे

प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाची साथ देणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये बाबाजी ढमढेरे हे एक होते. *बाबाजी ढमढेरे हे पुण्यातील शिरूर तालुक्यातील “तळेगाव ढमढेरे” या गावचे होते.
   
अफजलखानाच्या आक्रमाणवेळी एक सुरक्षित ठिकाण म्हणून शिवरायांनी कान्होजी जेधे यांचा कुटुंब कबिला तळेगावच्या बाबाजी ढमढेरे यांच्याच घरी ठेवला होता. हे जोखमीचे कार्य बाबाजी यांनी उत्तमरीत्या पार पाडले.
  
१६७७ साली शिवरायांची स्वारी दक्षिण दिग्विजयास जात असताना गोवळकोंड्यास कुतुबशहा तानाशहा यांची भेट घेतली. या प्रसंगी विश्वासू सहकाऱ्यांत बाबाजी ढमढेरे होते.   दिलेरखानाच्या तावडीतून संभाजीराजे स्वराज्यात सुखरूप पोहोचले तेव्हा शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यास जाऊन युवराज संभाजीची भेट घेतली. यावेळी एक विश्वासू मार्गदर्शक आणि अंगरक्षक म्हणून शिवाजी महाराजांनी बाबाजींची नेमणूक केली होती . त्यांच्या वंशावळींनी देखील राजाराम राजेंच्या संघर्षाच्या काळात मोलाची साथ दिली.
   
तंजावरकर भोसल्या विरुद्धचे बंड मोडून मराठी राज्याचे रक्षण केले. पुढे हीच ढमढेरे मंडळी पानिपतच्या युद्धात सदाशिवराव भाऊसोबत सामील होऊन अनेक मोठे संघर्ष यशस्वी पार पाडले.
  
स्वराज्य स्थापनेपासून ते स्वराज्याच्या अखेरपर्यंत बाबाजी ढमढेरे आणि त्यांच्या वंशजांनी स्वराज्याचे रक्षण करण्यास मोलाचे योगदान दिले.
close