इंदापूर तालुक्यात निमगाव केतकी परिसरात ४४ मेंढ्या अज्ञात आजाराने दगावल्या असून इतर मेंढ्यांना लागण झाल्याने मेंढपाळ चिंतेत.
पशुवैद्यकीय अधिकारी यांचे उपचारासाठी शर्तीचे प्रयत्न चालू.
इंदापूर : (दि. २२ जून२०२१) इंदापूर जि. पुणे मौजे कचरवाडी निमगाव केतकी येथील वन विभाग शेळगाव हद्दीत स्थलांतरित मेंढपाळ यांच्या ४४ मेंढ्या कावीळ व निमोनिया या संशयित आजाराने मरण पावलेले आहेत. सदर मेंढपाळ हे पाटस मोटेवाडा तालुका दौंड येथील असून सध्या शेळगाव हद्दीतील वन विभागात चरण्यासाठी आलेली आहेत. त्यामध्ये मेंढपाळांची सहा कुटुंबे असून यामध्ये गुलाब खडके २०० मेंढ्या ,हिरा बिरा खडके २३० मेंढ्या, संपत मल्हारी खडके १६० मेंढ्या, भगवान भोजू दगडे १८० मेंढ्या, लक्ष्मण खंडू तांबे १४९मेंढ्या, धुळा दगडू खडके १३० मेंढ्या, सध्या एकूण१०४० मेंढ्या पैकी ५२ मेंढ्या आजारी आहेत. आजारी मेंढ्यांना औषध उपचार करण्यात आले. तसेच सध्या पाच मेंढ्या मयत आढळून आले असून त्यांचे शेव विच्छेदन करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील विभागीय रोग निदान प्रयोगशाळेत पुढील निदानासाठी पाठवण्यात आलेले असल्याची माहिती डॉक्टर शिंदे यांनी दिली. सदर ठिकाणी डॉ. रामचंद्र शिंदे सहाय्यक गट विकास अधिकारी तथा पशुधन विकास अधिकारी, डॉ. संजय शिंदे, डॉ. मारुती काझडे, डॉ. भीमराव जानकर, डॉ. काळेल, डॉ. शेगर, श्री भोंग, सुरज चव्हाण, त्याचबरोबर गाव कामगार तलाठी इंगळे, माजी सरपंच परशुराम कचरे इत्यादी उपस्थित होते.
दरम्यानच्या काळात सदर ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण गोफने, शेतकरी सुकाणू समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीकांत करे, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब माने, ॲड .नेचर क्लबचे सचिन राऊत, इत्यादींनी भेट देऊन मेंढपाळांना धीर देऊन सदर मेंढ्यांना वैद्यकीय उपचार चांगल्या पद्धतीने कसे मिळतील यासाठी प्रयत्न केले.