जळगाव दौऱ्यात कांग्रेसचे संस्थानिक तुम्हाला किडनॅप करतील ... शिवराम पाटील..!!
प्रतिनिधी : संजय वायकर
जळगाव :(दि .२२) महाराष्ट्र परिवहन मंत्र्यांनी एसटी डेपोत ५०० खाजगी गाड्या घुसडण्याचा चुकीचा प्रयत्न केला.एसटी चे खाजगीकरणाची ही वाटचाल होती.शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप पक्षातील नेत्यांनी विरोध केला नाही. पण एसटी कर्मचाऱ्यांमधे अस्वस्थता निर्माण झाली.आम्ही ही परवहन मंत्री च्या दुष्ट हेतूला विरोध केला. आपणास मुंबई येथे भेटून आपणास निवेदन देऊन खाजगीकरणाला विरोध म्हणून मदत मागितली. आपण मदतीचे आश्वासन दिले.त्यानुसार मंत्रीमंडळाच्या बैठकीत एसटी खाजगीकरणाचा आदेश रद्द ठरवला.तशी जाहीर घोषणा अनिल परब यांनी पुणे येथे १८जून ला केली.
महोदय, आपण घेतलेल्या भुमिकेचे महाराष्ट्रातील तमाम एसटी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.आभार मानले.आपण असेच सहकार्य केले तर कांग्रेस पक्ष पुर्ववत जनमानसात रूजेल.
महोदय, आपण जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक हेतूने दौरा करीत आहात.मुख्यमंत्री बनण्याची ईच्छा ही आपण जाहीर केली. आम्ही स्वागत केले.शक्य आहे.अपेक्षा आहे.पण सांप्रत जिल्हा कमेटी नाकामयाब ठरल्याने अध्यक्ष सहित बदल करणे आवश्यक आहे. कार्यक्षम पदाधिकारी नियुक्त करणे गरजेचे आहे.
महोदय, कांग्रेस अजूनही गांधी नेहरूंचा वारसा सांगते.पण प्रत्यक्षात उलट दिशेने काम करीत आहे.भारतात त्याकाळी५०० संस्थानिक असतांना कोणीही स्वातंत्र्यासाठी मैदानात उतरले नाहीत.टिळक,गांधीजी,नेहरू,नेताजी यांनी आपली श्रीमंती व उच्च राहणीमान त्यागून जनमैदानात उतरले.हे ऐतिहासिक सत्य कोणीही नाकारू शकत नाहीत.आजही कांग्रेस पक्षाने गल्लाभरू संस्थनिकांच्या दलदलीत अडकून राहू नये.राजकीय पदे बगलेत मारून जनसेवा करण्याच्या निमित्ताने ही माणसे संस्थानिक बनली.हेच गांधी नेहरूंच्या तत्वाच्या विरोधात आहे.म्हणून कांग्रेस जनतेपासून दूर होऊन राजकीय दुबळी बनलेली आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक सेवा करणारा माणूस आर्थिक प्रबळ होणे हे अनैतिक कृत्य आहे.त्याचा दुष्परिणाम कांग्रेस पक्षाला बाधीत करीत आहे.
महोदय, आपण जळगाव जिल्ह्यात दौरा करतांना अनेक संस्थानिक आपणास किड्न्याप करतील.याचे भान ठेवून आपण जनमानसात मिसळावे.त्यांच्या कांग्रेस बाबत अपेक्षा ऐकून घ्याव्यात.एरवी जिल्ह्यातील कांग्रेस पदाधिकारी आपणास वारंवार भेटतच असतात.पण येथे जळगाव मधे तरी सामान्य जनांना आपण भेटावे.तरच कांग्रेस सर्व घटकांची मानता येईल.
महोदय, यासाठी आपण जिल्हा अध्यक्ष किंवा निष्क्रिय पदाधिकारी वर अवलंबून न राहाता शेतकरी,व्यापारी, गाळेधारक,फेरीवाले, घरकुल लाभार्थी अशा शिष्टमंडळांना भेट द्यावी.मागणी केल्यास त्यांना किमान १० मिनिटे तरी वेळ द्यावा. खाजगी सचिव मार्फत तसे वेळेचे नियोजन करून शिष्टमंडळांना कळवावे. मला कळवावे.जेणेकरून आपला दौरा सार्थकी होईल.
आपण जळगाव ला येऊन शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप विषयी काय भुमिका मांडतात,हे महत्त्वाचे नाही. जळगाव जिल्ह्यातील जनतेशी किती संवाद करतात,समस्या जाणून घेतात,त्या सोडवू शकतात,हे महत्त्वाचे आहे.
प्रदेश अध्यक्ष जळगावला यावेत,मी जळगावकर म्हणून मला त्यांचेकडून काय अपेक्षित आहे,हे मी मांडलेले आहे.पुढील दिशा आपण ठरवा.त्यावर आम्ही जळगावकरांचे कांग्रेस बाबत मत बनणार आहे.त्यावर आपल्या दौऱ्याचे फलित अवलंबून असणार आहे.
कांग्रेस पदाधिकाऱ्यांच्या भाऊगर्दीत मला माझे मत मांडायला संधी मिळणार नाही. म्हणून मी हे जाहिरपणे मांडत आहे.कांग्रेसहितवादी,जनहितवादी पदाधिकारी माझा संदेश आपणापर्यंत पोहचवतीलच.
...शिवराम पाटील.
9270963122.