पुणे : हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या वाहन चालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
अरुण मधुकर दीक्षित (वय 50 रा. जुनी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षित हे हवेली तहसील कार्यालयात शासकीय कार चालक आहेत. सध्या हवेली तहसीलदार म्हणून तृप्ती कोलते पाटील या कार्यरत आहेत. या दरम्यान आज सायंकाळी दीक्षित यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, याबाबत तृप्ती कोलते पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी चालक दीक्षित यांना पित्ताचा त्रास होता. ते आजाराने त्रस्त होते. त्याने दुसरा ढोस घेतला होता, असे सांगितले आहे.. घटनास्थळी सांगवी पोलिसांनी धाव घेतली आहे. अधिक तपास सुरू आहे.
याबाबत सांगवी पोलिसांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून ते घरीच होते.त्यांना पित्ताचा त्रास होता. आज सायंकाळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यांच्याकडे सुसाईड नोट मिळालेली नाही. अधिक तपास सुरू आहे.