shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण शिक्षण म्हणजे काय ?

पृथ्वीवरील जैव व अजैव  घटकातील अंतरक्रिया, त्यांचा परिणाम, कार्यपद्धती,व्याप्ती आणि व्यवस्थापन यांचे अध्ययन, अध्यापन म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. पर्यावरणाचा सजीवांवर होणारा परिणाम त्याला धरून उद्भवणार्‍या समस्या आणि त्याचे निराकरण याचे शिक्षण म्हणजे पर्यावरण शिक्षण! 

पर्यावरण शिक्षणाचे स्वरूप अत्यंत व्यापक  व सर्वस्पर्शी असायला हवे. पर्यावरणाचा अभ्यास प्रत्येक ज्ञानशाखेत केला जातो. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी सामाजिक शास्त्रातील विषय तसेच अभियांत्रिकी, तंत्रज्ञान या विषयातल्या पर्यावरणातील घटकांचे शिक्षण दिले जाते. 

जर पर्यावरण रक्षण करायचे असेल तर ते  सुधारण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान व प्रवृत्ती यांचा विकास कसा करता येईल याचा अभ्यास करायला पाहिजे. यासाठी मानवाची वैयक्तिक आणि सार्वजनिक वागणूक महत्त्वाची ठरते. पर्यावरण रक्षण करण्यासाठी सामाजिक घटकांना पर्यावरण रक्षणाची जाणीव,  आणि ज्ञान, वागणूक, कौशल्य आणि पर्यावरण रक्षणात सहभाग कसा घेता येईल याबाबत शिक्षण देणे गरजेचे आहे 



पर्यावरण शिक्षणामध्ये नैसर्गिक पर्यावरण, मानवनिर्मित तंत्रज्ञानात्मक सामाजिक , राजकीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक, सौंदर्यात्मक या बाबी येतात. पर्यावरणाचे शिक्षण हे सर्व पातळीवर देणे गरजेचे आहे. विविध शिक्षण पद्धतीमध्ये संतुलन साधणे म्हणजे पर्यावरण शिक्षण होय.

पर्यावरण रक्षणासाठी स्थानीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य पद्धती कशी असावी याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 


लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे

संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार


कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..

पर्यावरण दिन ५ जूनपासून वन हुतात्मादिन ११सप्टेंबरपर्यंत२०२१  असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान...

close