अशोक वारगे ओबीसीचे अध्यक्ष अलीबाग तालुका भारतीय जनता पार्टी..
प्रतिनिधी । राजेश बाष्टे (अलिबाग)
कोरोनाच्या प्रकोपामुळे वैद्यकीय सोयीउघड्या पडल्या. विशेषत: अपुऱ्या खाटांमुळे काही रुग्णांना वेळेत उपचारन मिळाल्याने त्यांचे जीव गेले. यामुळे तिसऱ्या लाटेचा अंदाजव घेऊन प्रशासन वैद्यकीय सोयी उभारण्यावर भर देत आहे
परंतु रायगड जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका इमारतीमध्ये घाई गडबडीत कोविड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांनी केले.
या बांधकामाकडे लक्ष दिले गेले नसल्याने ७० खाटांच्या या रुग्णालयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे काल पासून पडणाऱ्या पावसामुळे कोविड सेंटर मध्ये गळती लागली स्लायडिंग विंडो मधून पाणी येत आहे पूर्णपणे भिंती पाण्याने ओल्या होऊंन पाणी गळत असल्याने पेशन्ट च्या बेड वर पाणी पडत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अलिबाग तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसीचे अध्यक्ष अशोक वारगे यांनी आज या कोविड सेंटर ला भेट दिली असता त्यांच्या दृष्टीस पडले तसेच याठिकाणी महिला आणि पुरुष यांच्यासाठी एकच स्वच्छतातागृह असल्याने महिला पेशन्ट ना खूपच त्रासदायक होत आहे या प्रकाराची चौकशी आम्ही करणार असल्याचे अशोक वारगे यांनी यावेळी सांगितले