shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोरेगरीब जनतेस घरकूल देण्यासाठी सिईओ शिवानंद टाकसाळे यांचे पंचायत स्तरावर मार्गदर्शन..!


पूर्णा । प्रतिनिधी:- तालूक्यातील ग्रामीण भागात टीनपत्रे मातीच्या साध्या घरात आजही नागरिक वास्तव्य करतात. गरीब परिस्थिती मुळे ते स्वतः पक्की सिमेंटची घरे बांधू शकत नाहीत. काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील खेडेगावात जावून पंचायत स्तरावरील कर्मचा-यांनी कच्च्या घरांची पाहणी करुन त्यांची यादी बनवली होती. अशा गरजू लाभार्थ्यांना तात्काळ केंद्रांच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून तात्काळ घरकूले द्यायची आहेत. 


तेव्हा पंचायत स्तरावरील कर्मचा-यांनी आता पुन्हा कोणाची कच्च्या मातीची घरे आहेत?  अशा नागरीकांची प्राधान्यक्रम यादी तयार करावी. व अधिक उत्पन्न असणाऱ्या श्रीमंतांची नावे वगळून गरजूंना तात्काळ घरकूल मंजूर करुन कार्यारंभ आदेश द्यावेत. असे आदेशीत मार्गदर्शन जिल्हा परिषद परभणीचे विकासाभिमुख मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी नुकतीच पूर्णा पंचायत समिती येथे बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी, गटविकास अधिकारी श्रीमती वानखेडे, घरकूल अभियंता, ग्रामविकास विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.
close