shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विनय शेलुरे उत्कृष्ट आरोग्य कर्मचारी पुरस्काराने सन्मानित..!

मोर्शी - मोर्शी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी श्री.विनय सुदामपंत शेलुरे यांना त्यांच्या आजपर्यंतच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना अमरावती यांच्याकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


यावेळी राष्ट्रसेवा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य व मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रणमले सर,मा.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.जोगी सर,मा.जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.बनसोड सर उपस्थित होते. विनय शेलुरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालयातील त्यांच्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले..
close