shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंबाजोगाई नगरपालिकेवर 'मुंदडा' यांचा झेंडा फडकणार? - मोदी-मुंदडा यांच्यात नगराध्यक्षपदासाठी 'कांटे की टक्कर' निश्चित!

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी

गेल्या तीस वर्षांपासून अंबाजोगाई नगरपालिकेच्या राजकारणात असलेले राजकिशोर मोदी यांचे निर्विवाद वर्चस्व आता धोक्यात आले आहे. अगदी मुंदडा कुटुंबाकडे आमदारकी, राज्यमंत्रीपद आणि कॅबिनेट मंत्रीपद असतानाही नगरपालिकेवर 'झेंडा' फडकवण्यात त्यांना यश आले नव्हते. मात्र, आता या तीस वर्षांच्या प्रस्थापित समीकरणाला युवा नेते अक्षय मुंदडा थेट आव्हान देणार असल्याची जोरदार चर्चा अंबाजोगाईच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोदी विरुद्ध मुंदडा असा संघर्ष होणार हे स्पष्ट झाले आहे, ज्यामुळे अंबाजोगाईकरांचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले आहे.



स्थापनेतील समीकरण बदलणार?

​अंबाजोगाईकरांनी आजवर नगरपालिकेची धुरा राजकिशोर मोदी यांच्याकडे तर विधानसभेची जबाबदारी मुंदडा कुटुंबाकडे सोपवल्याचे चित्र आहे. 2016 च्या निवडणुकीत मुंदडा कुटुंबाकडे नगरसेवकांचे बहुमत आले, तरीही नगराध्यक्षपदी मोदीच विराजमान झाले होते. नगरपालिकेच्या राजकारणात मुंदडा परिवारातील कोणीही सदस्य थेट निवडणूक लढवली नव्हती.

​ युवा नेते अक्षय मुंदडा यांचे थेट आव्हान!

​यावेळी मात्र, कार्यकर्त्यांच्या तीव्र आग्रहास्तव आणि आमदार नमिताताई मुंदडा यांच्या माध्यमातून शहरात झालेल्या उत्कृष्ट विकास कामांच्या शिदोरीवर युवा नेते अक्षय मुंदडा यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचे जवळजवळ निश्चित केले असल्याची चर्चा आहे. नगराध्यक्षपद हे सध्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने मुंदडा यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.


विधानसभेतील विरोधाचा 'वचपा' घेणार?

​विधानसभा निवडणुकीत आमदार नमिताताई मुंदडा यांना राजकिशोर मोदी यांनी कडवा विरोध केला होता, तरीही मुंदडा यांचा दणदणीत विजय झाला होता. या विरोधाचा वचपा घेण्याची भावना आमदार समर्थकांमध्ये प्रबळ आहे आणि याच भावनेतून कार्यकर्त्यांचा अक्षय मुंदडा यांच्या उमेदवारीसाठी आग्रह आहे.


​विकासकामांच्या जोरावर मतदारांशी संवाद

​सध्या युवा नेते अक्षय मुंदडा आणि ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा हे प्रत्येक प्रभागातील मतदारांशी संवाद साधत आहेत. आ.नमिता मुंदडा यांच्या माध्यमातून शहरात झालेले उत्कृष्ट रस्ते, सुधारलेला वीज पुरवठा आणि पाणीपुरवठा योजनेची कामे यांसारख्या विकास कामांचा संग्रह घेऊन ते मतदारांशी संपर्क साधत आहेत.

​अंबाजोगाई शहरातील मतदार हा जात-पात-धर्म या पलीकडे जाऊन विचार करणारा आहे. शहरात शांतता, सौहार्दपूर्ण वातावरण आणि संस्कृतीची जपणूक करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी तो उभा राहिला आहे, हे विशेष!

​पुढील आठवड्यात निवडणुकांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, अंबाजोगाईत मात्र चर्चा फक्त एकाच गोष्टीची आहे - 'युवा नेते अक्षय मुंदडा हेच अंबाजोगाईचे पुढील नगराध्यक्ष' असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये तसेच जनतेमध्ये व्यक्त होत आहे.

close