उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इंदापूरात दिली ढोले कुटुंबातील विवाह सोहळ्याला भेट
इंदापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला भेट देऊन नववधूवरांना शुभाशीर्वाद दिले.
आज सायंकाळी इंदापूरातील वाघ पॅलेस येथे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची कन्या अक्षता हिचा बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथील पाखरे कुटुंबातील अभिजीत सोबत शाही विवाह पार पडत असून. या निमित्ताने अजित पवार यांनी या सोहळ्याला भेट देऊन नववधूवरांना शुभाशीर्वाद दिले .
 इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील ढोले कुटुंब हे एक राजकारणातील व शिक्षण क्षेत्रातील  कुटुंब म्हणून ओळखले जाते. श्रीमंत ढोले माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत तर त्यांच्या पत्नी चित्रलेखा ढोले या लाखेवाडी गावच्या सरपंच आहेत. बंधू दिलीप ढोले आणि त्यांच्या पत्नी सुजाता ढोले हे दोघेही प्रशासकीय सेवेतील मोठे अधिकारी आहेत. त्यामुळे इंदापूरच्या राजकारणात ढोले परिवाराला एक महत्त्व आहे. 
सध्या श्रीमंत ढोले हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे त्यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते.
त्यांच्या कुटुंबातील हा विवाह सोहळा इंदापूर मधील वाघ पॅलेस मध्ये आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पार पडणार असून बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथील पाखरे कुटुंबासोबत हा विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील अनेक दिग्गज मंडळी या विवाह सोहळ्याला आज उपस्थिती लावतील.

 
 
 
 
 
 
