श्रीरामपूर / प्रतिनिधी:
आपल्या ऐतिहासिक अहिल्यानगर शहरामध्ये प्रथमच रविवार दि.२ नोव्हेंबर २०२५ रोजी माऊली सभागृह सावेडी याठिकाणी सकाळी १० ते रात्री १० असा नाॅनस्टाॅप १२ तासांचा सुमधुर हिंदी-मराठी गीतांचा आगळा वेगळा असा महासंगीतोत्सव होत असून, महेश घावटे, स्वरात्मिक ग्रुप आणि डॉ. दमन काशिद हॉस्पिटल प्रस्तुत या कार्यक्रमामध्ये नगर शहरातील नामवंत ४० + गायक आणि गायिका आपली कला सादर करणार आहेत असे महेश घावटे यांनी सांगितले.
या अनोख्या कार्यक्रमामध्ये संगीत साधना, आरोग्याची काळजी, नवोदितांना संधी आणि पूरग्रस्त विद्यार्थ्यांना भरीव मदत करण्यात येणार असून अशाप्रकारे एकाच छताखाली संगीत सेवा आरोग्य सेवा आणि सामाजिक सेवा अशी त्रिवेणी सांगड घातलेली बघून सर्व सामाजिक स्तरातून  या कार्यक्रमाचे कौतुक होत आहे. सदर कार्यक्रमा मधील भाग घेणारे कलाकार हे वय वर्षे १० ते ७५ वयोगटातील असून, नगर शहरातील नामवंत डॉक्टर, इंजिनियर, व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी अशा विविध क्षेत्रातील हौशी कलाकार आहेत. 
आयोजक महेश घावटे एक व्यवसायिक असून ते स्वतः उत्तम गायक आहेत. ते गेल्या चार ते पाच वर्षांपासून नवोदित कलाकारांना संधी देऊन एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच उपक्रमा अंतर्गत घावटे यांनी गेल्या वर्षी माउली सभागृह येथे महिला दिना निमित्त भव्य असा सांगीतिक कार्यक्रम घेतलेला होता. त्यालाही श्रोत्यांनी भव्य असा प्रतिसाद दिला होता. त्याबरोबरच वर्षभरामध्ये सावेडी उपनगरांमधील  रावसाहेब पटवर्धन सभागृह, कोहिनुर मंगल कार्यालय अशा विविध ठिकाणी सांगीतिक कार्यक्रमांचे हि ते आयोजन करत असतात. यातून नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करणे , प्रोत्साहन देणे यासाठी ते नेहमीच उत्साही असतात. यापुढेही संगीतप्रेमीं साठी अशाच प्रकारचे कार्यक्रम करण्याचा त्यांचा मानस आहे.
नुकत्याच झालेल्या पूरपरिस्थिती मुळे नगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान असून, यामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झालेले आहे. सदर बाधित विद्यार्थ्यांना याद्वारे मदतिचे नियोजन आहे. या साठी आयोजक प्रयत्नशील असून यातून विद्यार्थ्यांना भरीव मदत करण्याचा आयोजकांचा मानस आहे. 
याबरोबरच माऊली सभागृह,सावेडी येथे सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ऋणानुबंध सामाजिक बहुउद्देशीय संस्था व डॉ. दमन काशीद हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबीराचे देखील आयोजन करण्यात आलेले असून, यामध्ये ठराविक आरोग्य तपासण्या मोफत (विनामूल्य)  होणार आहेत.  यामध्ये मूळव्याध, हर्निया,अपेंडिक्स तज्ञ , मुतखडा व किडनी विकार तज्ञ , हृदयविकार तज्ञ, नेत्र विकार तज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, अस्थीविकार तज्ञ, मधुमेह तज्ञ, संधीवात तज्ञ, दंत विकार तज्ञ अशा प्रकारचे नगर मधील नामवंत डॉक्टर्स मार्गदर्शन करणार आहेत. याचाही रसिक श्रोत्यांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोत्यांना लकी ड्रॉ द्वारे सोन्याची नथ, चांदीची नाणी, पैठणी, ४२" LED टीव्ही अश्या प्रकारची भव्य बक्षिसे जिकंण्याची संधी मिळणार आहे. यासाठी नगर शहरातील नामवंत प्रयोजकांचेही मोठ्या मोलाचे सहकार्य लाभले आहेत. यासोबतच रसिक श्रोत्यांच्या चहा पानाची तसेच अल्प दरात भोजनाची देखील व्यवस्था आयोजकांनी केलेली आहे.
सदर कार्यक्रमामध्ये डॉ. दमन काशीद, महेश घावटे, इंजि.अभिजित गायकवाड, अजित रोकडे, डॉ.विवेकानंद कंगे, प्रशांत बंडगर, भानुदास महानुर, अनिल खंडागळे, अजय आदमाने,  निलेश महाजन, यशवंत आंबेकर, ऍड.सचिन चंदनशिव, विजय भेंडे, राजू सावंत, राम खुडे, राजेंद्र शहाणे, विजय आंग्रे, सारंग पंधाडे, सुनील भंडारी, डॉ.नितीन जगताप, नरेश बडेकर, संजय माळवदे, वृषाल एकबोटे, संजय भिंगारदिवे, सुशील देठे, अन्वर शेख, बाबासाहेब जगताप, जालिंदर शिंदे, , रोनित सुखधान, जीवन महाजन, मास्टर आर्य महाजन, डॉ.गायत्री कुलकर्णी, प्रतीक्षा चांदणे, मोनाली बोरुडे, वैदेही बल्लाळ, वर्षा जांभेकर पुणे, रेणुका पवार, प्रतिभा साबळे, विद्या तन्वर, पूजा गडकरी, प्रा.सारिका रघुवंशी, पूनम कदम, ऍड.किरण जाधव, पल्लवी खरात हे कलाकार सहभागी होत असून या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिवानी शिंगवी आणि अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केलेले प्रसिद्ध निवेदक आणि रेडिओ जॉकी प्रवीण पोतदार (मुंबई) हे करणार आहेत.  
 सकाळी ९.४५ वा मोफत आरोग्य शिबीराचे उदघाटन होणार असून संगीत कार्यक्रम कार्यक्रम अगदी वेळेत म्हणजे सकाळी १० वाजता सुरु होणार आहे. सदर कार्यक्रमाचे  देणगी प्रवेशिका नाममात्र मूल्य १००/- रुपये ठेवण्यात आले आहे.श्रोत्यांचा प्रतिसाद पाहता कार्यक्रम हाऊस फुल होत असल्याने नगरकरांनी निराशा टाळण्यासाठी  लवकरात लवकर आपली प्रवेशिका आरक्षित करण्याचे आवाहन आयोजकां तर्फे करण्यात आलेले आहे. प्रवेशिका मिळवण्यासाठी
श्री स्वामी समर्थ मोबाईल पारिजात चौक, गुलमोहर रोड सावेडी 7350881515, 9326230230 (महेश घावटे)
डॉ काशीद हॉस्पिटल ओबेरॉय हॉटेल समोर नगर मनमाड रोड सावेडी 8956363668(श्री.ज्ञानेश्वर माने) अक्षर ऑफसेंट रंगारगल्ली, चितळेरोड 9326250851
श्री स्वामी समर्थ सुपर मार्केट
नानाचौक तपोवन रोड सावेडी 9890136655 याठिकाणी संपर्क साधावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
*वृत्त विशेष सहयोग*
 ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग* 
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

 
 
 
 
 
 
