शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) सामाजिक बातमी
साकुरी शिव येथील ओम साई मिल्क संचलित येल्हुगंगा दूध संकलन व विक्री केंद्र यांच्यामार्फत दूध उत्पादकांना दिवाळीनिमित्त लाभांश भेटवस्तू व फराळाचे वाटप करण्यात आले प्रती लिटर एक रुपया वीस पैसे प्रमाणे प्रत्येक उत्पादकाच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले असून उत्पादकांना किटली टोकर विळा कोयता या भेटवस्तू व दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सामाजिक व्यक्तिमत्व डॉ धनंजय जगताप प्रगतशील शेतकरी नंदकुमार शेळके साई संस्थान सोसायटीचे माजी व्हा चेअरमन बापूसाहेब कोते प्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब चौगुले याप्रमाणे अनेक मान्यवर उपस्थित होते केंद्र व्यवस्थापक दत्ता आसने यांनी सांगितले की यावर्षी अवेळी पडणारा पाऊस लिंपी सारखा जीवघेणा आजार खाद्याचे वाढत असलेले भाव व चाऱ्याचा निर्माण झालेला तुटवडा यासारख्या अनेक संकटांना उत्पादकांना तोंड द्यावे लागले.
त्यामुळे दीपावली सारखा मोठा सण उत्पादकांना करण्याची इच्छा उरलेली नाही तरीही आमच्या संस्थेच्या वतीने मयूर मिल्क चे सर्वेसर्वा मयूर टेमगिरे तसेच ओम साई मिल्कचे जालिंदर चौधरी यांच्या बहुमोल सहकार्याने या सर्व उत्पादकांची दिवाळी गोड करत त्यांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करण्याची छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे या सर्व उत्पादकांच्या जीवावरच आमची संस्था उभी आहे त्यामुळे उत्पादक हाच आमच्या सर्वांसाठी केंद्रबिंदू ठेवून कायमच सोबत राहत सामाजिक बांधिलकी जपत राहु यावेळी परिसरातील सर्व उत्पादक व नागरिक उपस्थित होते.